Join us  

IPL 2024 : १८ कोटी ५० लाख रूपयांच्या खेळाडूवर रिंकू 'भारी', पण IPLचा पगार १ कोटीपेक्षा कमी

 rinku singh ipl price 2024 : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 3:57 PM

Open in App

Rinku Singh IPL Price 2024 KKR : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील तीन सामने झाले असून यजमान भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. १ डिसेंबरला चौथा सामना रायपूर येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेतून भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. सूर्यकुमार यादव भारताच्या युवा ब्रिगेडचे नेतृत्व करत आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारून देखील भारताला विजय मिळवता आला नाही. एकीकडे ही मालिका सुरू असताना जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल देखील चर्चेत आली आहे. गुजरात टायटन्सचा मावळता कर्णधार हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी झाली आणि आतापासून आयपीएल रंगात आली.  

आयपीएल सर्वात श्रीमंत लीग असल्याने या स्पर्धेत खेळावं ही प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. आयपीएलसमोर आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दबदबा देखील फिका पडतो. याचा प्रत्यय अनेकदा पाहायला मिळाला आहे. अनेक युवा खेळाडूंनी या स्पर्धेत प्रभावी कामगिरी करून आपली नवीन ओळख निर्माण केली. यातीलच एक नाव म्हणजे रिंकू सिंग... रिंकूने मागील आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सविरूद्ध एकाच षटकात पाच षटकार ठोकून इतिहास रचला. मात्र, आयपीएलमध्ये अविस्मरणीय कामगिरी करून देखील रिंकूच्या मानधनात म्हणावी तशी वाढ झाली नाही. 

IPLचा पगार १ कोटीपेक्षा कमी आगामी आयपीएल हंगामासाठी पंजाब किंग्सने सॅम कुरनला कायम ठेवले आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनला पंजाब किंग्जने मागील हंगामात १८ कोटी ५० लाख रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले होते. यंदाच्या मिनी लिलावापूर्वी सॅम कुरन लिलावाच्या रिंगणात असेल, अशी अपेक्षा होती. पण पंजाबच्या फ्रँचायझीने सॅम कुरनला कायम ठेवत सर्वांनाच चकित केले. सॅम कुरनचा आयपीएल पगार १८ कोटी ५० लाख रुपये आहे. रिंकू सिंगबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याला आयपीएल २०२३ च्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने ५५ लाख रूपये दिले होते. आता आगामी हंगामासाठी केकेआरने रिंकूला रिटेन केले असून आयपीएल २०२४ साठी रिंकूला मानधन म्हणून फक्त ८० लाख रूपये मिळणार आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२३रिंकू सिंगकोलकाता नाईट रायडर्स