मुंबई : आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाला जॅक कॅलिसनंतर आता नवीन प्रशिक्षक मिळाला आहे. कॅलिसची जागा आता न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने घेतली आहे. केकेआर आणि मॅक्युलम यांचे नाते फार जुने आहे.
आयपीएलच्या पहिल्या मोसमात मॅक्युलम हा केकेआरमध्ये होता. आयपीएलमधील पहिले शतक मॅक्युलमच्याच नावावर आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून मॅक्युलम केकेआरच्या संघाला ओळखतो. त्यामुळेच मॅक्युलमच्या गळ्यात संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ टाकण्यात आली आहे. आता आयपीएलच्या 2020च्या मोसमात मॅक्युलम हा केकेआरचा मुख्य प्रशिक्षक असेल. मॅक्युलम हा 2008 सालापासून केकेआरच्या संघात होता. केकेआरने जेव्हा 2012 जेतेपद पटकावले होते, तेव्हा मॅक्युलम हा संघात होता.
या निवडीबाबत मॅक्युलम म्हणाला की, " माझ्यासाठी केकेआरचे मुख्य प्रशिक्षक मिळणे, ही मोठी गोष्ट आहे. हा माझा सन्मान आहे. संघाला यश कसे मिळवून द्यायचे, याचाट विचार आता माझ्या डोक्यात सुरु असेल."