IPL 2021, Eoin Morgan : कोलकाता नाइट रायडर्सनं ( Kolkata Knight Riders ) गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पराभूत केले. KKRनं मुंबई इंडियन्सचे १५६ धावांचे लक्ष्य ७ विकेट्स व २९ चेंडू राखून सहज पार केले. आता त्यांच्या खात्यात ९ सामन्यांअंती ८ गुण झाले आहेत. पण, या सामन्यानंतर KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) याच्यावर दंडात्मक कारवाई झाली आणि त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवारही लटकत आहे.
विराट कोहलीकडे RCBचे कर्णधार वाचवण्याची शेटवची संधी; फ्रँचायझीनं दिलीय तंबी?
नेमकं काय झालं?
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या रोहित शर्मा ( ३३) व क्विंटन डी कॉक ( ५५) यांनी मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून दिली. पण, मधल्या फळीनं घात केला. पोलार्डनं १५ चेंडूंत २१ धावा करताना संघाला ६ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रसिद्ध व ल्युकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिफाठी यांनी अर्धशतकी खेळी केली. अय्यरनं ३० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. राहुलनं ४२ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७४ धावा केल्या. KKR नं १५.१ षटकांत ३ बाद १५९ धावा करून विजय पक्का केला.
विराट कोहलीच्या आवडत्या गोलंदाजाला किरॉन पोलार्डनं दिली खुन्नस, Video Viral
कोलकाता नाइट रायडर्सला पुन्हा एकदा षटकांची गती कायम राखण्यात अपयश आले. निर्धारित वेळेत षटकं पूर्ण न टाकल्यामुळे IPLनं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे कर्णधार मॉर्गनला २४ लाखांचा दंड भरावा लागला आहे, तर प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख किंवा मॅच फीमधील २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. मॉर्गनकडून पुन्हा हि चूक झाल्यास त्याला एका सामन्यासाठी मैदानाबाहेर बसावे लागणार आहे.