IPL, CPLपाठोपाठ शाहरुख खानची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक

आहे. शाहरूख खान हा IPLमधील कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि CPL मधील त्रिनबागो नाईट रायडर्स ( Trinbago Knight Riders) या दोन संघाचा मालक आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: December 1, 2020 03:41 PM2020-12-01T15:41:15+5:302020-12-01T15:41:41+5:30

whatsapp join usJoin us
Kolkata Knight Riders to invest in Major Cricket League in America | IPL, CPLपाठोपाठ शाहरुख खानची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक

IPL, CPLपाठोपाठ शाहरुख खानची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यानं इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) आणि कॅरेबियन प्रीमिअर लीग ( CPL) पाठोपाठ अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेट ( Major League Cricket) मध्ये गुंतवणूक केली आहे. अमेरिकेतील क्रिकेटसाठी ही मोठी गोष्ट आहे. शाहरूख खान हा IPLमधील कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि CPL मधील त्रिनबागो नाईट रायडर्स ( Trinbago Knight Riders) या दोन संघाचा मालक आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेतील आणि इंग्लंडमधील 'दी हंड्रेड' लीगमध्येही संघ खरेदी करण्याची चर्चा सुरू आहे.
 

KKRनं २०१२ व २०१४ मध्ये आयपीएल जेतेपद पटकावले आहे. २०१५मध्ये शाहरुख खानं CPLमधील फ्रँचायझीचे मालकी हक्क खरेदी केले आणि त्यानंतर झालेल्या सहा पर्वात चार जेतेपद त्रिनबागो संघाने पटकावले. शाहरुख खान म्हणाला,''नाईट रायडर्स हा ब्रांड जगभरात पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.''


Web Title: Kolkata Knight Riders to invest in Major Cricket League in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.