Join us

KKRची मोठी घोषणा! इंग्लंडच्या स्फोटक खेळाडूला घेतलं संघात; केला २.८ कोटींचा वर्षाव

Kolkata Knight Riders Sign Jason Roy : 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 14:36 IST

Open in App

shreyas iyer ipl, Kolkata Knight Riders । नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2023) १६व्या हंगामातून कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) नियमित कर्णधार श्रेयस अय्यर बाहेर आहे. त्यामुळे युवा खेळाडू नितीश राणा संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. अशातच केकेआरच्या फ्रँचायझीने  इंग्लंडच्या स्फोटक खेळाडूची संघात निवड केली आहे. केकेआरने इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जेसन रॉयला आपल्या ताफ्यात घेतले आहे. यासाठी त्यांनी २.८ कोटी रूपये मोजले आहेत. खरं तर रॉयची मूळ किंमत भारतीय रकमेनुसार १.५ कोटी रूपये एवढी होती. 

दरम्यान, श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मधून बाहेर झाला आहे. याशिवाय केकेआरचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने देखील चालू हंगामातून माघार घेतली आहे. त्यामुळे दोन महत्त्वाच्या खेळाडूंची कमी भरून काढण्यासाठी जेसन रॉयची संघात निवड करण्यात आली आहे. रॉय शेवटच्या वेळी २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये खेळला होता. 

सनरायझर्स हैदराबादकडून ५ सामन्यांमध्ये रॉयने १५० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका अर्धशतकी खेळीचा समावेश आहे. ३२ वर्षीय इंग्लिश फलंदाजाने ६४ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून १३१.६१ च्या स्ट्राईक रेटने १५२२ धावा केल्या आहेत. यामध्ये रॉयच्या नावावर ८ अर्धशतकांची नोंद आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सश्रेयस अय्यरइंग्लंड
Open in App