Kolkata Knight Riders trolls MS Dhoni - कोलकाता नाइट रायर्डसनं रविवारी उगाचच वाद ओढावून घेतला. सिडनी कसोटीत इंग्लंडनं कडवी टक्कर देताना ऑस्ट्रेलियाला ड्रॉ निकालावर समाधान मानण्यास भाग पाडले अन् इथे KKRनं त्यावरून महेंद्रसिंग धोनीला ट्रोल केले. या ट्विटनंतर चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याच्यासह CSKच्या फॅन्सनी KKRला फैलावर घेतलं. KKRनं त्यांच्या ट्विटमध्ये २०१६सालचा KKR आणि रायझिंग पुणए सुपरजायंट्स ( RPSG) यांच्यातल्या लढतीचा फोटो पोस्ट केला आहे.
अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या अखेरच्या दोन फलंदाजांना बाद करण्यासाठी सर्व क्षेत्ररक्षकांना खेळपट्टीनजीक उभं केलं. पण, इंग्लंडच्या खेळाडूंनी उत्तम खेळ करताना हा सामना ड्रॉ राखला. पॅट कमिन्स अँड कंपनीला इंग्लंडची अखेरची विकेट घेता आली नाही. पण, ऑस्ट्रेलियानं लावलेल्या फिल्डिंगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
KKR नं २०१६च्या आयपीएलमध्ये पुणेविरुद्धच्या सामन्यात अशीच फिल्डिंग लावली होती. तेव्हा गौतम गंभीर KKRचा कर्णधार होता आणि धोनी फलंदाजीला होता. पुणेकडून खेळणाऱ्या धोनीसाठी ते पर्वा काही खास गेले नव्हते आणि लेग स्पिनरला खेळण्यात तो अपयशी ठरला होता. त्यामुळे पियूष चावलाच्या गोलंदाजीवर गौतम गंभीरनं धोनीसाठी अशी फिल्डिंग लावली होती.
KKRनं तो आणि आजच्या अॅशेस कसोटीतील फोटो कोलाज करून पोस्ट केला व त्यावर लिहिले, कसोटी क्रिकेटमधील हा क्लासिक क्षण आम्हाला ट्वेंटी-२०ती त्या मास्टर स्ट्रोकची आठवण करून देतोय.