Join us  

पांड्या कुटुंबात आला छोटा पाहुणा; नाव ठेवलं गेलं 'वायू'! 

हार्दिक आणि कृणाल पांड्या या दोन्ही भावांनी अथक मेहनतीच्या जोरावर भारतीय क्रिकेटमध्ये आपलं नाव कमावलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 5:09 PM

Open in App

भारतीय क्रिकेटमधील पांड्या ब्रदर्स हे सर्वांच्या परिचयाचे आहेत... हार्दिक आणि कृणाल पांड्या या दोन्ही भावांनी अथक मेहनतीच्या जोरावर भारतीय क्रिकेटमध्ये आपलं नाव कमावलं. हार्दिक तर भारतीय ट्वेंटी-२० संघाचा उप कर्णधार आहे आणि रोहित शर्माच्या गैरहजेरीत त्याने ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्वही केले आहे. हार्दिक हा भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे. हार्दिकने २०२० मध्ये बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसोबत लग्न केलं आणि या दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे. कृणाल पांड्याही फिरकीपटू आहे आणि त्यानेही ५ वन डे व १९ ट्वेंटी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. पण, तो हार्दिकसारखा चमकला नाही.

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्येही दोन्ही भावांची कामगिरी तितकीशी खास झालेली दिसत नाही. हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे, तर कृणाल लखनौ सुपर जायंट्सकडून खेळतोय. क्रिकेटच्या मैदानावर यांच्या वाट्याला दुःख आलेले असले तरी पांड्या कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कृणाल व त्याची पत्नी पंखुडी यांनी बाळाला जन्म दिला आहे. २१ एप्रिलला त्यांच्या घरी हा पाहुणा आला आणि कृणालने आज ट्विट करून ही गोड बातमी सर्वांना दिली. या दोघांनी बाळाचे नाव वायू असे ठेवले आहे. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव कवीर आहे आणि १८ जुलै २०२२ मध्ये त्याचा जन्म झाला होता.  

कृणाल - पंखुडी यांची लव्ह स्टोरीकृणाल आणि पंखुडी यांची भेट एका कॉमन मित्राने करू दिली. त्या भेटीचं प्रेमात रुपांतर कधी झाले, ते दोघांनाही समजले नाही. दुखापतीमुळे कृणाल बराच काळ मुंबईत होता आणि त्यादरम्यान त्याची अन् पंखुडीच्या भेटीचं सत्र सुरू झालं. हार्दिकलाही बऱ्याच दिवसानंतर हे माहीत पडलं. पंखुडीचे कुटुंबीय मुंबईत राहतात. तिचे वडील राकेश शर्मा उद्योगपती आहेत, तर आई अनुपमा गोवा येथे इंटीरिअर डिझायनर आहे. पंखुडी कुटुंबात सर्वात लहान आहे आणि तिच्या मोठ्या बहिणीचं नाव तान्या आहे. २०१७ मध्ये डिसेंबर महिन्यात दोघांनी लग्न केलं. 

टॅग्स :क्रुणाल पांड्याआयपीएल २०२४ऑफ द फिल्ड