मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वाचे जेतेपद पटकावताना ऐतिहासिक कामगिरी केली. हे त्यांचे आयपीएलमधील पाचवे जेतेपद आहे आणि आयपीएलचा चषक सर्वाधिकवेळा उंचावण्याचा पराक्रमात त्यांना आणखी एका चषकाची भर टाकली आहे. ही विक्रमी कामगिरी करून मायदेशात परतलेल्या मुंबई इंडियन्सच्या आनंदात मीठाचा खडा पडल्यासारखी घटना घडली. MIच्या ताफ्यातील प्रमुख खेळाडू कृणाल पांड्या ( Krunal Pandya) याला गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल संचलनालय यंत्रणेकडू अडवण्यात आले. त्यानंतर कृणाल पांड्याचीच चर्चा दिवसभर रंगली.
कृणालनं UAEहून परतताना नियमापेक्षा अधिक सोनं व महागडी घड्याळं आणली आणि त्याची कोणतीच माहिती विमानतळावरील महसूल संचलनालयाला दिली नाही. संचलनालयाला मिळालेल्या टीपनूसार ही कारवाई झाली आणि 29 वर्षीय पांड्याला अडवण्यात आले. त्याच्याकडे Audemars Piguet डायमंडची दोन आणि Rolex Modelsची दोन अशी एकूण चार महागडी घड्याळं सापडली आणि त्याची माहिती त्यानं महसूल विभागाला दिली नव्हती. या घड्याळ्यांची किमंत ही जवळपास 1 कोटीच्या घरात जाते. चार्टड फ्लाईटनं सायंकाळी 4.30 वाजला मुंबईत दाखल झालेल्या पांड्याची तीन तासांहून अधिक काळ चौकशी केली गेली. घड्याळं जप्त करूनत त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
''मुंबई विमानतळाच्या कस्टम्स विभागाकडे हे प्रकरण व ती घड्याळं सुपूर्द करण्यात आली आहेत. आता पांड्याला त्यावरील कर आणि दंड भरावा लागेल,''अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पांड्याला घड्याळांच्या किमतीच्या 38.5 टक्के कर भरावा लागेल.
यंदाच्या आयपीएलमध्ये पांड्यानं 109 धावा आणि 6 विकेट्स घेतल्या. त्यात 26 धावांत 2 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. २०१६ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण झाल्यापासून पांड्या मुंबई इंडियन्स संघात सहभागी झाला आहे. कृणालने आतापर्यंत ५५ सामने खेळले आहेत आणि ८९१ धावा केल्या आहेत आणि ४० विकेट्स घेतले आहेत. कृणालचा आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट स्कोअर ८६ तर सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा आकडा ३/१४ आहे.
Read in English
Web Title: Krunal Pandya's luxury watch worth 1 crore seized at Mumbai International Airport
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.