IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका लढतीवर वीज संकट; बिल न भरल्याने स्टेडियमची कापली लाईट

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 06:28 PM2022-09-21T18:28:21+5:302022-09-21T18:29:15+5:30

whatsapp join usJoin us
KSEB cut power supply of Greenfield Stadium ahead of IND vs SA Series   | IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका लढतीवर वीज संकट; बिल न भरल्याने स्टेडियमची कापली लाईट

IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका लढतीवर वीज संकट; बिल न भरल्याने स्टेडियमची कापली लाईट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ही मालिका संपल्यावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी (IND vs SA) भिडणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी या मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्धच्या मालिकांमधून भारतीय संघ विश्वचषकाची तयारी करत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना 28 सप्टेंबर रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड स्टेडियमवर होणार आहे.

दरम्यान, आफ्रिकेविरूद्धची मालिका सुरू होण्यासाठी अवघे 10 दिवस उरले असताना केरळ स्पोर्ट्स फॅसिलिटी लिमिटेडने (KSFL) सर्वांचे लक्ष वेधले आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, केरळ राज्य विद्युत मंडळाने (KASB) थकबाकीमुळे स्टेडियमचा वीजपुरवठा खंडित केला आहे, ज्याची सध्याची थकबाकी तब्बल 2.5 कोटी रुपये आहे.

विशेष बाब म्हणजे स्टेडियमच्या देखभालीचे काम सध्या जनरेटरच्या मदतीने केले जात असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय स्टेडियमच्या आवारात विजेशिवाय खेळाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी एक बैठक पार पडली. खरं तर केरळ स्पोर्ट्स फॅसिलिटी लिमिटेड ही संस्था ग्रीनफील्ड स्टेडियम चालवत आहे, मात्र मागील तीन वर्षांपासून वीज आणि पाणी बिलाची थकबाकी भरलेली नाही. 

बिल न भरल्याने स्टेडियमची कापली लाईट 
केरळ सरकारच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ग्रीनफील्ड स्टेडियम चालवणाऱ्या संस्थेचे मत आहे की, ते राज्य सरकारच्या वार्षिक निधीशिवाय थकबाकी भरण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्यावरून वाद रंगण्याची चिन्ह आहेत. लक्षणीय बाब म्हणजे अहवालात असेही म्हटले आहे की, जर वेळेत थकबाकी दिली नाही तर स्टेडियमचा पाणीपुरवठा थांबवण्याची धमकी देखील केरळ जल प्राधिकरणाने दिली आहे. या स्टेडियमवर जवळपास 50,000 प्रेक्षक उपस्थित राहतील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे, मात्र या समस्येवर कधी तोडगा निघतोय हे पाहण्याजोगे असेल. 

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे टी-20 सामने 
पहिला सामना - 28 सप्टेंबर - तिरुवनंतपुरम 
दुसरा सामना - 2 ऑक्टोबर - गुवाहाटी
तिसरा सामना - 4 ऑक्टोबर - इंदौर 


 

Web Title: KSEB cut power supply of Greenfield Stadium ahead of IND vs SA Series  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.