नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये भारताच्या कुलदीप यादवने पाच बळी मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली होती. या कामगिरीमुळेच त्याला सामनावीराच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. पण त्याच्या या यशामागे आता कपिल यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचेही समोर येत आहे.
कुलदीप हा चायनामन फिरकीपटू आहे, तर कपिल देव हे वेगवान गोलंदाज. त्यामुळे कपिल कुलदीपला कसे मार्गदर्शन कसे करू शकतात, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर कुलदीपला मार्गदर्शन करणारे कपिल देव नसून कपिल पांडे आहेत. हे पांडे सर कुलदीपला वयाच्या दहाव्या वर्षापासून क्रिकेटचे धडे गिरवत आहे.
कपिल यांनी काय केले मार्गदर्शनफिरकी मारा करताना चेंडूला चांगली उंची द्यायची. काहीवेळा चेंडूच्या गतीमध्ये बदल करायचा, तर काही वेळा चेंडू टाकण्याची जागा बदलायची. गोलंदाजीमध्ये वैविध्य असायला हवं, पण त्याचबरोबर चेंडूला चांगली उंची द्यायला विसरू नकोस, असा सल्ला कपिल पांडे यांनी कुलदीपला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी दिला होता.