मुंबई : भारतीय संघाचा युवा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून झालेल्या आक्षेपार्ह पोस्टबाबत चाहत्यांची माफी मागितली आहे. इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचं कुलदीपने स्पष्ट केलं आहे. इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचं समजल्यानंतर कुलदीपने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली.
माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून थोड्यावेळापूर्वी शेअर झालेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी मी माफी मागतो. माझं इन्स्टाग्राम हॅक झालं होतं. स्वतःचा पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी यापुढे आवश्यक खबरदारी घेईन असं ट्विट कुलदीपने केलं.