Join us  

कुलदीप यादव न खेळताच संघाबाहेर; अक्षर पटेलला पुन्हा संधी

बंगळुरूत १२ मार्चपासून डे-नाईट कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 5:35 AM

Open in App

नवी दिल्ली : भारत - श्रीलंका यांच्यात १२ मार्चपासून बंगळुरू येथे होणाऱ्या दुसऱ्या डे - नाईट कसोटीसाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. २८ वर्षांच्या अष्टपैलू अक्षर पटेलचे संघात पुनरागमन झाले, तर फिरकी गोलंदाज २७ वर्षांचा कुलदीप यादव याला न खेळविताच बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

 पहिल्या कसोटीआधी अक्षर पटेल फिट नव्हता. या दरम्यान तो मोहालीत ६ मार्च रोजी संघासोबत जुळला. मोहाली कसोटीत कुलदीपला अक्षरचा बॅकअप खेळाडू म्हणून घेण्यात आले होते. संघ व्यवस्थापनाच्या मते संघाला तीन डावुखऱ्या फिरकी गोलंदाजांची गरज नाही. रवींद्र जडेजा, सौरभ कुमार आणि अक्षर पटेल हे तीन डावखुरे गोलंदाज आहेत. शिवाय अश्विन आणि जयंत यादव हे अन्य फिरकीपटू आहेतच.

 बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्ध २२ फेब्रुवारी रोजी कसोटी संघाची निवड केली. त्यावेळी अक्षर फिट नव्हता. त्यावेळी बोर्डाने सांगितले होते की, अक्षर सध्या फिट नाही, दुसऱ्या कसोटीआधी त्याची फिटनेस चाचणी घेतली जाईल. अक्षरने मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो मैदानाबाहेर आहे. द. आफ्रिका दौऱ्यातही त्याची संघात निवड झाली नव्हती. आता पूर्णपणे फिट असून, बंगळुरू कसोटी खेळण्यास सज्ज आहे.दरम्यान, व्यवस्थापनाने दुसरे फलंदाजी कोच अपूर्व देसाई, ट्रेनर आनंद दाते आणि फिजियो पार्थो यांना रिलिज केले. माजी फिरकी गोलंदाज साईराज बहुतुले हा मात्र संघासोबत कायम असेल.

डे नाईट कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, अक्षर पटेल, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार).

टॅग्स :कुलदीप यादवभारत विरुद्ध श्रीलंका
Open in App