- सुनील गावसकर लिहितात...भारताविरुद्ध नेमके कसे खेळायचे या विवंचनेत वेस्ट इंडिज संघ सध्या चाचपडतो आहे. या संघाने मोठी धावसंख्या उभारली. अनेक संघ इतक्या मोठ्या धावांचा बचाव करण्यात यशस्वी होतात पण गुवाहाटीच्या खेळपट्टीवर भारताने केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात ४२.१ षटकांतच लीलया विजय नोंदविला. विराट आणि कोहली खेळपट्टीवर असतील तर जगातील कुठलाही मारा त्यांना रोखू शकत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पराभवासाठी विंडीजचे काही फलंदाज जबाबदार आहेत. नको त्यावेळी चुकीचे फटके मारून ते बाद झाले, अन्यथा २०-३० धावांची भर पडणे शक्य होते. यामुळे सामना आणखी रोमहर्षक होऊ शकला असता. अर्धशतक ठोकणारा किएरॉन पोलार्ड, शाय होप आणि पॉवेल यांना घाई नडली.धावा तर निघत होत्याच पण चुकीचे फटके मारण्याची किंमत पराभवात झाली. या सर्वांनी रोहित किंवा कोहलीकडून काही शिकायला हवे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने शतक पूर्ण झाल्यानंतरच उंचावरून फटका मारला. दोघांनी विजयी लक्ष्य गाठताना घाई केली नाही. भारताला उर्वरीत सामन्यांत एकमेव चिंता बाळगण्याची गरज आहे ती क्षेत्ररक्षणात. अलीकडे क्षेत्ररक्षणात उच्च मापदंड स्थापन करणाऱ्या टीम इंडियाचे गुवाहाटीतील क्षेत्ररक्षण लौकिकास्पद नव्हतेच. यावर संघ व्यवस्थापनाला लक्ष देण्याची गरज आहे.विशाखापट्टणमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल मानली जाते. अशावेळी भारत चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला खेळवणार? गुवाहाटीत शतक ठोकणाºया हेटमायरला कुलदीपने तीनदा फिरकीच्या जाळ्यात अडकविले आहे. पण कुलदीपला खेळविले तर कुणाला बाहेर ठेवायचे ही संघव्यवस्थापनापुढे डोकेदुखी आहे. पण कुणाला निवडण्यापेक्षा कुणाला बाहेर ठेवावे, हा प्रश्न लवकर सोडविण्यासारखा आहे. (पीएमजी)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कुलदीप यादवला संघात संधी मिळणार?
कुलदीप यादवला संघात संधी मिळणार?
भारताविरुद्ध नेमके कसे खेळायचे या विवंचनेत वेस्ट इंडिज संघ सध्या चाचपडतो आहे. या संघाने मोठी धावसंख्या उभारली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 3:34 AM