Join us  

गल्ली बॉय! २ वर्ष बाकावर बसून ठेवला; संधी मिळताच CSKवर भारी पडला,गावातील लोक आनंदी

राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपरकिंग्जच्या सामन्यात विशेष लक्ष वेधले ते म्हणजे राजस्थानचा वेगवान गोलंदाज कुलदीप यादवने.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 11:58 AM

Open in App

राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानावर शानदार विजय मिळवताना तुफान फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला ३२ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ५ बाद २०२ धावा केल्यानंतर चेन्नईला २० षटकांत ६ बाद १७० धावांवर रोखले. यासह राजस्थानने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर चेन्नईची तिसऱ्या स्थानी घसरण झाली.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपरकिंग्जच्या सामन्यात विशेष लक्ष वेधले ते म्हणजे राजस्थानचा वेगवान गोलंदाज कुलदीप यादवने. शिमरॉन हिटमायरच्या जागी राजस्थान रॉयल्स संघानं कुलदीप यादवला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संधी देण्यात आली आणि त्यानं या संधीचं सोनं केलं. कुलदीपनं तीन षटकांत फक्त १८ धावा देत महत्त्वाची विकेट घेतली. कुलदीपनं चेन्नईचा फलंदाज शिवम दुबेला बाद केले. 

सलग तीन वर्ष आयपीएलमध्ये सामील होऊनही त्याला ही विकेट घेण्याची संधी मिळाली नव्हती. कुलदीप यादवनं आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पण तो हा एकच सामना खेळला. त्यानंतर २०२३मधील चेन्नई विरुद्धचा सामना त्याच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील दुसरा सामना होता. आयपीएल २०२१मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो बेंचवरच होता. आता आयपीएल 2023 मध्ये त्याला राजस्थाननं चेन्नईविरुद्ध खेळण्याची संधी दिली आहे.

एक दिवस भारतीय संघात खेळावे हे कुलदीप यादवचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. कुलदीप म्हणाला की, तो क्रिकेटमध्ये दोन खेळाडूंना आदर्श मानतो. ते म्हणजे फलंदाजीत एमएस धोनी आणि गोलंदाजीत जहीर खान. राजस्थान संघाला आयपीएल जिंकून देण्यात आपली पूर्ण भूमिका बजावण्याचे काम करणार असल्याचे त्याने सांगितले. कुलदीप यादवने गावातील गल्लीगोळात क्रिकेट खेळून इथपर्यंत पोहचल्यानंतर गावीतल नागरिकांना देखील त्याचा अभिमान आहे. 

कुलदीप यादव २६ वर्षांचा आहे. त्याचा जन्म १५ ऑक्टोबर १९९६ रोजी हरियाणामधील गुरुग्राम जिल्ह्यातील पतौडी येथे झाला. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळतो. कुलदीप डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. २०१९मध्ये तो U-23भारतीय संघाचा भाग होता. तो २०२१पासून आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. तीन वर्षांच्या या काळात मागील दोन हंगामात त्याला फक्त एकच सामना खेळता आला. 

टॅग्स :राजस्थान रॉयल्सआयपीएल २०२३
Open in App