दिल्ली कॅपिटल्सचा जलदगती गोलंदाज तुषार देशपांडे याने यंदाच्या सत्रातील पॉवर प्ले मधील सर्वात महागडे षटक टाकले आहे. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब विरोधात एकाच षटकात २६ धावा दिल्या. त्याआधी खलील अहमद २२ विरुद्ध सीएसके, ट्रेंट बोल्ट २० विरुद्ध पंजाब अशी आकडेवारी होती.
योगायोगाने हे तिन्ही सामने दुबईच्या मैदानावर खेळवले गेले आहेत. आयपीएलमधील फक्त तिसरा सामना खेळणाºया तुषार देशपांडेला पाचव्या षटकांत कर्णधार शिखरने चेंडू सोपवला. पण त्याच्या समोरहोता तो युनिर्व्हसल बॉस ख््िरास गेल. गेलने तुषारच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. नंतर त्याने दुसºया आणि चौथ्या चेंडूवर चौकार तर तिसºया आणि पाचव्या चेंडूवर षटकार वसूल केले. याषटकांत गेलने २६ धावा वसुल केल्या. यंदाच्या सत्रात पॉवर प्ले मधील हे सर्वात महागडे षटक ठरले. या सामन्यात तुषारने दोन षटकातच ४१ धावा दिल्या. मात्र आपल्या पर्दापणातील सामन्यात तुषारने राजस्थान रॉयल्सचे दोन बळी मिळवले होते.
सलग पाचव्या सामन्यातील अपयशानंतर पृथ्वी ट्रोलर्सच्या निशाण्यावर
दिल्ली कॅपीटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला गेल्या पाच सामन्यात फार काही करता आले नाही. त्यातील दोन सामन्यात तर तो शुन्यावरच बाद झाला आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या फॅन्सच्या निशाण्यावर तो आला आहे. पंजाबविरोधात खेळताना पृथ्वीने ११ चेंडूत फक्त सात धावा केल्या. तर आधीच्या सामन्यात त्याला ०,०,४ आणि १९ धावा करता आल्या आहेत. असे असले तरी त्याने सीएसके आणि केकेआर विरोधात शानदार अर्धशतके ठोकली होती. दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर, शिखर धवन यांना त्याच्या क्षमतेवर पुर्ण विश्वास आहे. मात्र मंगळवारच्या सामन्यात पंजाब विरोधात बाद झाल्यावर त्याला ट्रोलर्सनी सोडले नाही. त्याच्यावर आगपाखड केली. त्यातच मागील सामन्याच्या वेळी त्याचा खातांनाचा फोटो टिष्ट्वटरवर व्हायरल झाला आहे. त्याची तुलना सचिनशी केली जात होती. त्यावरूनदेखील ट्रोलर्सनी त्याला फौलावर घेतले आहे. २१ वर्षांच्या पृथ्वीने १० सामन्यात २०९ धावा केल्या आहेत.