Join us  

KXIP vs DC Latest News : निकोलस पूरन- मयांक अग्रवाल यांचा गोंधळ; दिल्ली कॅपिटल्सला मिळाली आयती विकेट! Video

शिखर धवनची ( Shikhar Dhawan) ची बॅट पुन्हा तळपली. दिल्ली कॅपिटल्सन नाणेफेक जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ( Kings XI Punjab) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 20, 2020 10:03 PM

Open in App

शिखर धवनची ( Shikhar Dhawan) ची बॅट पुन्हा तळपली. दिल्ली कॅपिटल्सन नाणेफेक जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ( Kings XI Punjab) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धवननं एकहाती खिंड लढवताना Indian Premier League ( IPL 2020) मध्ये  सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावून दिल्लीला ( DC) समाधानकार पल्ला गाठून दिला. लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या KXIPला पहिल्या पॉवर प्लेमध्ये तीन धक्के बसले. 

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी DCच्या डावाची सुरुवात केली, परंतु यावेळी ही जोडी फार मोठी भागीदारी करू शकली नाही. पृथ्वी शॉ ( ७) चौथ्या षटकात निशॅमच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. विकेट पडली असली तरी मागच्या सामन्यातील शतकवीर धवनची फटकेबाजी सुरूच होती. धवनने आयपीएलमधील ४०वे अर्धशतक झळकावले. आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरनंतर ( ४६) ४०+ अर्धशतक करणारा तो दुसराच खेळाडू आहे. रिषभ पंत आणि धवन यांची ३३ धावांची भागीदारी ग्लेन मॅक्सवेलनं तोडली. पंत १४ धावांवर बाद झाला. मार्कस स्टॉयनिस ( ९) लगेच माघारी परतला. शिखर धवन ६१ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह १०६ धावांवर नाबाद राहीला. दिल्लीनं २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. 

पाहा गंभीरची शतकी खेळी

प्रत्युत्तरात पंजाबला तिसऱ्या षटकात अक्षर पटेलनं मोठा धक्का दिला.     फॉर्मात असलेला लोकेश राहुल ( १५) लगेच मघारी परतल्यानं पंजाबची मालकिण प्रीती झिंटा टेंशनमध्ये दिसली. पण, ख्रिस गेलनं तिचं टेंशन हलकं केल. तुषार देशपांडेच्या एका षटकात गेलनं २६ धावा कुटल्या अन् संघाला अर्धशतकी पल्ला गाठून दिला. गेलचं हे वादळ रोखण्यासाठी आर अश्विनला पाचारण केले गेले आणि त्यानं युनिव्हर्स बॉसचा ( २९) त्रिफळा उडवला. त्याच षटकात निकोलस पूरन आणि मयांक यांच्यातील ताळमेळ चुकला अन् पंजाबला तिसरा धक्का बसला. हो ना हो ना करताना मयांकला विकेट गमवावी लागली आणि पेव्हेलियनमध्ये परतताना त्यानं नाराजी व्यक्त केली.

 

टॅग्स :IPL 2020दिल्ली कॅपिटल्सकिंग्स इलेव्हन पंजाब