शिखर धवनची ( Shikhar Dhawan) ची बॅट पुन्हा तळपली. दिल्ली कॅपिटल्सन नाणेफेक जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ( Kings XI Punjab) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धवननं एकहाती खिंड लढवताना Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील सलग चौथ्या सामन्यात ५०+ धावा केल्या. त्यानं सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावून दिल्लीला ( DC) मोठा पल्ला गाठून दिला.
पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी DCच्या डावाची सुरुवात केली, परंतु यावेळी ही जोडी फार मोठी भागीदारी करू शकली नाही. पृथ्वी शॉ ( ७) चौथ्या षटकात निशॅमच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. विकेट पडली असली तरी मागच्या सामन्यातील शतकवीर धवनची फटकेबाजी सुरूच होती. पहिल्या पॉवर प्लेमध्ये DCने १ बाद ५३ धावा केल्या. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर यानं खणखणीत षटकार मारून धावांचे खाते उघडले. धवननं २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना दिल्लीच्या डावाला आकार दिला. पण, पुढच्याच चेंडूवर अय्यरला ( १४) मुरुगन अश्विननं बाद केलं. धवनचे हे आयपीएलमधील ४०वे अर्शतक ठरले. आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरनंतर ( ४६) ४०+ अर्धशतक करणारा तो दुसराच खेळाडू आहे.
यासह त्याने सलग चार सामन्यांत ५०+ धावा केल्या आहेत. या कामगिरीसह त्यानं विराट कोहलीच्या ( २०१६) सलग चार ५०+ खेळीच्या विक्रमाशी बरोबरी केली. यासह त्यानं आयपीएलमध्ये ५००० धावांचा पल्लाही ओलांडला. विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यानंतर असा पराक्रम करणारा तो पाचवा खेळाडू ठऱला. रिषभ पंत आणि धवन यांची ३३ धावांची भागीदारी ग्लेन मॅक्सवेलनं तोडली. पंत १४ धावांवर बाद झाला. मार्कस स्टॉयनिस ( ९) लगेच माघारी परतला. शिखर धवननं ५७ चेंडूत दुसरे शतक झळकावलं. आयपीएलमध्ये सलग दोन सामन्यांत शतक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
शिखर धवनचे सलग चार ५०+ धावा६९* वि. मुंबई इंडियन्स५७ वि. राजस्थान रॉयल्स१०१* वि. चेन्नई सुपर किंग्स१०० ( खेळतोय) वि. किंग्स इलेव्हन पंजाब