किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) सलग दोन सामने जिंकून Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. KXIPला टेबल टॉपर दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) सामना करावा लागत आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुखापतीतून सावरणाऱ्या रिषभ पंतचे आजच्या सामन्यात पुनरागमन झाल्यानं अजिंक्य रहाणेला पुन्हा बाकावर बसावे लागले आहे. पंत व्यतिरिक्त DCच्या संघात शिमरॉन हेटमायर व डॅनीएल सॅम यांनी स्थान पटकावले आहे. KXIPच्या संघात जिमी निशॅमची एन्ट्री झाली असून ख्रिस जॉर्डनला विश्रांती देण्यात आली आहे.
पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी DCच्या डावाची सुरुवात केली, परंतु यावेळी ही जोडी फार मोठी भागीदारी करू शकली नाही. पृथ्वी शॉ ( ७) चौथ्या षटकात निशॅमच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. विकेट पडली असली तरी मागच्या सामन्यातील शतकवीर धवनची फटकेबाजी सुरूच होती. पहिल्या पॉवर प्लेमध्ये DCने १ बाद ५३ धावा केल्या. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर यानं खणखणीत षटकार मारून धावांचे खाते उघडले. धवननं २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना दिल्लीच्या डावाला आकार दिला. पण, पुढच्याच चेंडूवर अय्यरला ( १४) मुरुगन अश्विननं बाद केलं. धवनचे हे आयपीएलमधील ४०वे अर्शतक ठरले. आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरनंतर ( ४६) ४०+ अर्धशतक करणारा तो दुसराच खेळाडू आहे.
Kings XI Punjab Playing XI: लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, जिमी निशॅम, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग
Delhi Capitals Playing XI: पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिमरोन हेटमायर, डॅनीएल सॅम्स, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, तुषार देशपांडे, कागिसो रबाडा