इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीतील चौथ्या स्थानासाठीची लढाई अधिक कट्टर होताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्सचे ( Chennai Super Kings) आव्हान संपुष्टात आले असले तरी अजून चार संघ शर्यतीत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे सध्या आघाडीवर आहेत, परंतु आजच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) नं त्यांना सुरुवातीलाच तीन धक्के दिले. शुबमन गिल ( Shubhman Gill) आणि इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांनी KKRची पडझड थांबवली. गिलनं अर्धशतक करताना KKRला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पण, KXIPनं सुरुवात दमदार केली.
नाणेफेक जिंकून KXIPनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार लोकेश राहुलनं पहिलंच षटक ग्लेन मॅक्सवेलला टाकायला दिलं आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर नितिश राणाला ( ०) ख्रिस गेलकरवी बाद केले. त्यानंतर मोहम्मद शमीनं पुढच्याच षटकात राहुल त्रिपाठी ( ७) आणि ३०० वा ट्वेंटी-20 सामना खेळणाऱ्या दिनेश कार्तिकला ( ०) बाद केले. KKRचे तीन फलंदाज १० धावांवर माघारी परतले. कर्णधार इयॉन मॉर्गन आणि शुबमन गिल यांनी चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. मॉर्गननं २५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४० धावा केल्या. गिलनं ४५ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून ५७ धावा करताना KKRला धीर दिला. ल्युकी फर्ग्युसननं अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना नाबाद २४ धावा करून KKRला ९ बाद १४९ असा समाधानकारक पल्ला गाठून दिला.
प्रत्युत्तरात लोकेश राहुल व मनदीप सिंग यांनी KXIPला ४७ धावांची सलामी करून दिली. ८व्या षटकात वरुण चक्रवर्थीनं KXIPला पहिला धक्का दिला. त्यानंतर मनदीप आणि ख्रिस गेल यांनी KXIPचा डाव सावरताना एकाच सामन्यात समान विक्रम केला. या दोघांनी आजच्या सामन्यात पंजाबकडून १००० धावांचा पल्ला पार केला.
IPLमध्ये पंजाबकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाजशॉन मार्श - २४७७डेव्हिड मिलर - १८४७लोकेश राहुल - १८४३ग्लेन मॅक्सवेल - १२८८वृद्धीमान सहा - १११५कुमार संगकारा - १००९मनदीप सिंग - १००६*ख्रिस गेल - १००४*