इंदूर - लोकेश राहुलने केलेल्या धडाकेबाज 84 धावांच्या खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा सहा विकेट्स राखून पराभव केला. एकीकडून राजस्थानचे गोलंदाज सामन्यावर नियंत्रण ठेवून असताना लोकेश राहुलने जिद्दीने फलंदाजी करत पंजाबचा डाव सावरला. त्याने करुण नायरसोबत 50 आणि मार्क स्टोयनिससोबत अभेद्य 68 धावांची खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला. लोकेश राहुलने 54 चेंडूत सात चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 84 धावांची खेळी केली.
राजस्थान रॉयल्सचे आव्हान पूर्ण करताना पंजाबची सुरुवात काहीशी संथ झाली. ख्रिस गेल हा ११ चेंडूत ८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मयांक अग्रवालही लवकर तंबूत पतरला. नायर (३१ धावा) याने राहुल सोबत ५० धावांची भागीदारी केली. त्यानंतर राहुल याने डावाची सूत्रे हातात घेत तुफानी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.होळकर स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर. अश्विन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सने कर्णधार अजिंक्य रहाणेऐवजी जोश बटलर आणि डी आर्सी शॉर्ट यांना सलामीला उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय राजस्थानच्या अंगलट आला. शॉर्ट हा फक्त दोन धावांवर बाद झाला. अश्विनने त्याला बाद करत किंग्ज पंजाबला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर रहाणे(५ धावा) देखील फारवेळ टिकू शकला नाही. संजु सॅमसन आणि बटलर यांनी ४९ धावांची भागिदारी केली. अखेरच्या काही षटकांत श्रेयस गोपाल (२३ धावा) याने फटकेबाजी करत राजस्थानला दीड शतकी धावसंख्या गाठुन दिली.संक्षिप्त धावफलकराजस्थान रॉयल्स २० षटकांत ९बाद १५२ धावा (जोश बटलर ५१, संजू सॅमसन २८, श्रेयस गोपाल २४ गोलंदाजी - मुजीब उर रहमान ३/२७, अँड्र्यु टे २/२४)किंग्ज इलेव्हन पंजाब १८.४ षटकांत १५५ धावा (राहुल ८४, करुण नायर ३१, गोलंदाजी - गौतम १/१८, अनुरित सिंग १/२०)
11.27 PM : किंग्स इलेव्हन पंजाबची राजस्थान रॉयल्सवर 6 विकेट्सनी मात, लोकेश राहुलची खेळी ठरली निर्णायक.
11.15PM : लोकेश राहुलचे अर्धशतक, पंजाबचे सामन्यात पुनरागमन
10.59PM : पंजाबच्या 100 धावा पूर्ण, 14.2 षटकांत पंजाबचे शतक लागले फलकावर
10. 55PM : पंजाबला चौथा धक्का, अक्षर पटेल माघारी
10:43PM पंजाबला तिसरा धक्का, नायर तंबूत
10:37PM - दहा षटकानंतर पंजाबच्या दोन बाद 68 धावा, राहुल 35 धावांवर खेळत आहे.
10:26PM - आठव्या षटकांत पंजाबचे अर्धशतक फलकावर. राहुल 20 चेंडूत 26 धावांवर खेळत आहे.
10:18PM - सहा षटकानंतर पंजाबच्या दोन बाद 34 धावा. के.एल राहुल 18 धावांवर खेळत आहे.
10:10PM - पंजाबला दुसरा धक्का, मयांक अगरवाल तंबूत, स्टोक्सने केले बाद. पंजाबच्या 4.4 षटकांत दोन बाद 29 धावा
10:05PM - पंजाबला पहिला धक्का, जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर गेल आठ धावांवर बाद झाला.
09:37PM - पंजाबला विजयासाठी 153 धावांचे आव्हान
राजस्थानने निर्धारित 20 षटकांत 9 गड्यांच्या मोमबदल्यात 152 धावांपर्यंत मजल मारली आहे. पंजाबला विजयासाठी 153 धावांचे आव्हान दिले आहे. जोस बटलरचा अपवाद वगळता राजस्थानचा एकही फलंदाज पंजाबच्या माऱ्याचा सामना करु शकला नाही. बटलरने अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने त्यालाही मोठा फटका खेळून माघारी परतावं लागलं. पंजबचा युवा गोलंदाज मजीब रेहमानने अचूक टप्यावर गोलंदाजी करत राजस्थानच्या फलंदाजाला तंबूत झाडले. मुजीबने आपल्या 4 षटकांत 27 धावा देत तीन गडी बाद केले. आश्विन, अक्षर पटेल आणि अंकित राजपूतने प्रत्येकी 1-1 बळी घेत मजीबला चांगली साथ दिली.
09:24PM - राजस्थानची घसरगुंडी सुरुच, राहुल त्रिपाठी तंबूत.
09:15pm कृष्णप्पा गौतम पाच धावांवर बाद, 116 धावांवर राजस्थनाला सातवा धक्का.
09:07pm - मजीब रेहमानची कमाल, राजस्थानला सहावा धक्का
युवा गोलंदाज मजीब रेहमानने बटलर आणि जोफ्रा यांना लागोपाठच्या दोन चेंडूवर बाद करत राजस्थानच्या अडचणी वाढवल्या. मुजीबने आपल्या 4 षटकांत 27 धावा देत तीन गडी बाद केले. 15 षटकानंतर राजस्थानच्या सहा बाद 110 धावा झाल्या आहेत. कृष्णप्पा गौतम आणि राहुल त्रिपाठी सध्या खेळत आहेत.
09:04pm राजस्थानचा अर्ध संघ तंबूत अर्धशतकी खेळीनंतर बटलर बाद.
09:01 PM जॉस बटलरचे दमदार अर्धशतक
एका बाजूने विकेट पडत असताना बटलरने 37 चेंडूत अर्धशतकी खेळी केली.
09:00 PM - राजस्थानला चौथा धक्का, स्टोक्स बाद
सीमारेषेवर मयांक अग्रवाल-मनोज तिवारीमधल्या भन्नाटताळमेळामुळे स्टोक्स बाद.
08:49PM - संजू सॅमसन बाद
संजू सॅमसन 23 चेंडूत एक षटकार आणि दोन चौकरांसह 28 धावा काढून बाद झाला. अँड्रू टायच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात नायरकडे झेल देऊन बाद झाला. बटलसोबत 49 धावांची महत्वपुर्ण भागिदारी केली.
08:45PM - सॅमसन-बटलर जोडीने राजस्थानचा डाव सावरला
दोन विकेट झटपट पडल्यानंतर अडचणीत सापडलेल्या राजस्थानचा डाव बटलर आणि सॅमसन जोडीने सावरला आहे. दहा षटकानंतर राजस्थानच्या दोन बाद 81 धावा झाल्या आहेत. सॅमसन 20 चेंडूत 27 धावांवर खेळत आहे. तर जॉस बटलर 31 चेंडूत सहा चौकारांसह 41 धावांवर नाबाद आहे.
08:34PM - 8 षटकांत राजस्थानच्या दोन बाद 66 धावा
08:25PM - सहा षटकानंतर राजस्थानच्या दोन बाद 45 धावा. बटलर 20 चेंडूत 29 धावांवर खेळत आहे. तर संजू सॅमसन सात चेंडूत 3 धावांवर खेळत आहे
08:21PM - कर्णधार अजिंक्य रहाणे बाद
08:09PM - जॉस बटलरने फटकेबाजीला सुरुवात केली, अंकित राजपूतच्या षटकात बटलरने 17 धावा वसूल केल्या. दोन षटकानंतर राजस्थान एक बाद 24 धावा
08:03PM - पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अश्विनने डी'आर्की शॉर्टला बाद करत पंजाबला पहिले यश मिळवून दिले. डी'आर्की शॉर्ट दोन धावांवर बाद झाला.
पंजाब संघ -
राजस्थानचा संघ
07:33PM - पंजाबने नाणेफेक जिंकली, राजस्थानची प्रथम फलंदाजी
07:15PM - दोन्ही संघाचे मैदानावर आगमन, थोड्याच वेळात सुरु होणार सामना
प्रतिस्पर्धी संघ -
पंजाब संघ : आर. अश्विन (कर्णधार), आरोन फिंच, डेव्हिड मिलर, करुण नायर, मनोज तिवारी, मयांक अगरवाल, अक्षर पटेल, ख्रिस गेल, मंझूर दार, मार्कस स्टॉइनिस, प्रदीप साहू, युवराज सिंग, अक्षदीप नाथ, लोकेश राहुल, अॅड्रू टाय, अंकित राजपूत, बरिंदर सरन, बेन ड्वारशस, मयांक डागर, मोहित शर्मा, मजीब उर रेहमान.
राजस्थान संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, डी'आर्की शॉर्ट, जतिन सक्सेना, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, स्टुअर्ट बिन्नी, हेनरिक क्लासेन, जोस बटलर, प्रशांत चोप्रा, संजू सॅमसन, अंकित शर्मा, अनुरीत सिंह, आर्यमान बिर्ला, बेन लॉघलीन, धवल कुलकर्णी, दुष्मांता चामीरा, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, सुधेशन मिथुन, झहीर खान, डी'आर्की शॉर्ट.