सलग विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) Indian Premier League ( IPL 2020) स्पर्धेत राजस्थान रॉयल्ससमोर ( Rajasthan Royals) तगडं आव्हान उभं केलं. पहिल्याच षटकात KXIPला धक्का बसला, परंतु त्यानंतर लोकेश राहुल व ख्रिस गेल ( Chris Gayle) यांच्या वादळी खेळीनं RRच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. गेलनं तुफान फटकेबाजी करताना KXIPला ५ बाद १८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण, गेलचं शतक अवघ्या एका धावेनं हुकल्यानं त्याच्या चाहत्यांना दुःख नक्की वाटलं असेल. तसे ते गेललाही वाटलं आणि ९९ धावांवर त्रिफळाचीत झाल्यानंतर गेलनं रागात जे केलं, ते पाहून सर्वच थक्क झाले.
राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार स्टीव्हन स्मिथचा हा निर्णय जोफ्रा आर्चरनं पहिल्याच षटकात योग्य ठरवला. जोफ्रानं टाकलेल्या बाऊंसरनं KXIPचा ओपनर मनदीप सिंग याला चकवा दिला आणि बेन स्टोक्सनं अशक्य वाटणारा कॅच टिपून RRला पहिलं यश मिळवून दिलं. चौथ्या षटकात ख्रिस गेलला १२ धावांवर असताना जीवदान मिळालं. वरुन आरोनच्या चेंडूवर गेलनं उंच फटका मारला आणि रियान परागच्या हातून तो सुटला. त्यानंतर गेल व लोकेश राहुलची गाडी जी सुसाट सुटली ती रोखताना RRच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आले.
ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. गेलनं ३३ चेंडूंत अर्धशतक झळकावलं. यंदाच्या आयपीएलमधील हे त्याचे तिसरे अर्धशतक ठरलं. लोकेश राहुलही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आला होता, परंतु बेन स्टोक्सनं त्याला माघारी पाठवलं. राहुलनं ४१ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार मारून ४६ धावा केल्या. त्यानं गेलसह दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. त्यानंतर गेल व निकोलस पूरन यांच्या फटकेबाजीनं अबु धाबीत कॅरेबियन फ्लेवर आणला. गेलनं या सामन्यात ७ वा षटकार खेचून १००० षटकारांचा पल्ला गाठला. ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. गेल ६३ चेंडूंत ६ चौकार व ८ षटकार मारून ९९ धावांवर माघारी परतला. पंजाबनं २० षटकांत ४ बाद १८५ धावा चोपल्या.
९९ धावावंर बाद झाल्यामुळे गेलनं रागात त्याची बॅटच फेकली. पाहा व्हिडीओ..
Web Title: KXIP vs RR Latest News : Chris Gayle throws his bat after getting out on 99 in frustration, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.