KXIP vs SRH Latest News : सलग तीन विजय मिळवत आगेकूच करीत असलेला किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि सनराजयर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातील सामना चुरशीचा झाला आहे. डेव्हिड वॉर्नरनं ( David Warner) नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी वॉर्नरचा विश्वास सार्थ ठरवला आणि पंजाबला १२६ धावांवर रोखले. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या जोडीनं सनरायझर्स हैदराबादसाठी मजबूत पाया रचला होता. पण, तरीही माफक लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबनं हैदराबादला अखेरच्या षटकापर्यंत झुंजवलं आहे.
लोकेश राहुल व मनदीप सिंग यांनी पंजाबच्या डावाची सुरुवात केली. शुक्रवारी रात्री मनदीप सिंग याचे वडील यांचे वृद्धापकाळानं निधन झालं. ते दुःख बाजूला सोडून मनदीप मैदानावर उतरल्यानं साऱ्यांनी त्याचे कौतुक केलं. पण, तो १७ धावांवर माघारी परतला. ख्रिस गेलनं सुरुवात तर चांगली केली, परंतु जेसन होल्डरनं त्याला ( २०) बाद केले. पुढच्याच षटकात राशिद खाननं KXIPचा कर्णधार राहुलला ( २७) त्रिफळाचीत केले. ग्लेन मॅक्सवेलचा फ्लॉप शो याही सामन्यात कायम राहिला. संदीप शर्मानं त्याला १२ धावांत माघारी पाठवले. दीपक हुडा ( ०), ख्रिस जॉर्डन ( ७) आणि मुरुगन अश्विन ( ४) हेही झटपट माघारी परतले. संदीप शर्मा, राशिद खान व जेसन होल्डर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. निकोलस पूरननं ( ३२*) पंजाबला ७ बाद १२६ धावांपर्यंत मजल मारून दिली.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी हैदराबादला एकहाती विजय मिळवून देईल, असे वाटत असताना रवी बिश्नोईनं हैदराबादला झटका दिला. वॉर्नर २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मुरुगन अश्विननं १९ धावांवर बेअरस्टोचा त्रिफळा उडवला. मोहम्मद शमीनं हैदराबादला तिसरा धक्का देताना अब्दुल समदला ( ७) माघारी जाण्यास भाग पाडले. हैदराबादची गाडी रुळावरून घसरताना दिसत होती.
विजय शंकर आणि मनीष पांडेंनी संयमी खेळ करताना ही पडझड थांबवली, परंतु त्यांची ३३ धावांची भागीदारी ख्रिस जॉर्डननं संपुष्टात आणली. जॉर्डनच्या गोलंदाजीवर पांडेनं खणखणीत फटका मारला, परंतु जगदीसन सुचिथनं सीमारेषेवर अफलातून झेल घेत हैदराबादला धक्का दिला. विजय शंकरही २६ धावांवर माघारी परतला. बाद होण्याच्या आधीच्या चेंडूवर विजय शंकरनं सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. १८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर धाव घेताना निकोलस पूरननं केलेला थ्रो शंकरच्या हेल्मेटवर आदळला अन् तो जमिनीवर लोळला. त्यानंतर तातडीनं वैद्यकीय टीमनं मैदानावर धाव घेतली. पंजाबची सह मालकीण प्रिती झिंटाही टेंशनमध्ये दिसली.
Video
Web Title: KXIP vs SRH Latest News : Oh no! Vijay Shankar's hit on the left side of his helmet
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.