लंडन : दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कायले अॅबोटने बुधवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमाला गवसणी घातली. इंग्लिंश कौंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायर क्लबचे प्रतिनिधित्व करताना अॅबोटने 86 धावांत 17 विकेट्स घेतल्या. 1956 साली जीम लेकर यांच्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. लेकर यांनी 63 वर्षांपूर्वी मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत 90 धावांत 19 विकेट्स घेतल्या होत्या.
जानेवारी 2017मध्ये अॅबोटने शेवटचे दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो म्हणाला,''ही कामगिरी अविश्वसनीय आहे.'' कौंटी चॅम्पियनशीपमधील 80 वर्षांत प्रथमच 17 विकेट्स घेतल्या गेल्या आहेत. हॅम्पशायरने पहिल्या डावातील 196 धावांच्या उत्तरात सोमेरसेटचा पहिला डाव 142 धावांवर गडगडला. त्यानंतर जेम्स व्हिंसीच्या 142 धावांच्या जोरावर हॅम्पशायरने दुसऱ्या डावात 226 धावा करताना सोमेरसेटसमोर 280 धावांचे लक्ष्य ठेवले. पण त्यांना 144 धावा करता आल्या.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी19/90 जीम लेकर 195618-?? एफ डब्लू लिलीवहायर 183718-96 एच ए आर्सराईट 186117-?? एफ पी फेन्नर 184417-46 जे विसडन 185317-48 सी ब्लीथे 190717-50 सीटीबी टर्नर 188817-54 डब्लूपी हॉवेल 1902/0317-56 सीडब्लूएल पार्कर 192517-67 एपी फ्रिमन 192217-86 कायले अॅबोट 2019 *