सिडनी : ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेन याच्या दुहेरी शतकाच्या बळावर शनिवारी तिसऱ्या कसोटीच्या दुस-या दिवशी पहिल्या डावात ४५४ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही सावध पाऊल टाकले. तिस-या स्थानी फलंदाजीला आलेल्या लाबुशेन याने येथे २१५ धावा फटकवून सर्वोत्कृष्ट खेळी केली. चहापानाआधी आॅस्ट्रेलियाचा डाव आटोपला. न्यूझीलंडने अखेरच्या सत्रात बिनबाद ६३ धावा केल्या. कर्णधार टॉम लाथम २६ व मेलबोर्न कसोटीचा शतकवीर टॉम ब्लंडेल २४ धावा काढून नाबाद होते. आजचा दिवस गाजवला तो लाबुशेन यानेच. ३६३ चेंडूंचा सामना करीत त्याने १९ चौकार आणि एक षट्कार मारला. याआधी त्याने ब्रिस्बेन येथे पाकविरुद्ध सर्वोत्कृष्ट १८५ धावांची खेळी केली होती. मागच्यावर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ११०४ या सर्वाधिक धावा केल्या होत्या. लेगस्पिनर टोड अॅस्टल याने आपल्याच चेंडूवर त्याचा झेल टिपला.
लाबुशेन याचे दुहेरी शतक झाल तेव्हा कर्णधार टीम पेन दुसºया टोकावर होता. मात्र, तो ३५ धावांवर बाद झाला. पेन-लाबुशेन यांनी ७९ धावांची भागीदारी करीत संघाच्या ४०० धावा पूर्ण केल्या. आॅस्ट्रेलियाने सकाळी ३ बाद २८३ वरून खेळ सुरू केला. पहिल्याच षटकात मॅथ्यू वेड बाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेड १० धावांवर बाद झाला. आॅस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीत २० जणांना प्राण गमवावे लागले. धुरामुळे वातावरणदेखील प्रदूषित झाले आहे. तथापि, सामन्याला अद्याप तरी खराब हवामानाचा फटका बसलेला नाही. (वृत्तसंस्था)
Web Title: Labushen against New Zealand, 2 runs for Australia; A careful start to the Kiwis
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.