- अयाझ मेमनवर्षभरापूर्वी मार्नस लाबुशेन याने दुबई येथे झालेल्या पाकिस्तानविरोधात कसोटी क्रिकेटमध्ये पर्दापण केले. त्यावेळी तो दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर तो सुमारे सहा महिने राखीव खेळाडू होता. त्याची पुन्हा संघात वर्णी लागेल याची खात्री नव्हती. मात्रल आता कसोटीत विराट कोहली, स्टिव्ह स्मिथ, केन विल्यम्सन यांच्या बरोबरीने अव्वल चार खेळाडूंमध्ये त्याचे नाव घेतले जात आहे.अॅशेस मालिकेतील दुसºया कसोटीत स्टिव्ह स्मिथ दुखापतग्रस्त झाल्याने लाबुशेन याच्या कारकिर्दीला संजीवनीच मिळाली. नव्या नियमानुसार त्याला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने आॅस्ट्रेलियाकडून कठीण परिस्थितीत ५९ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला नियमित संघात स्थान मिळाले. त्या कसोटीनंतर सहा महिन्यात लाबुशने याने असाधारण फलंदाजी केली आहे. त्याने अखेरच्या १० डावात सहावेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तसेच त्याने तीनवेळा शतकी धावसंख्या ओलांडली आहे. त्यात न्यूझीलंड विरोधातील २१५ धावांच्या खेळीचा समावेश आहे.लाबुशेन याने १४ कसोटीत २२ डावांत १४०० धावा केल्या आहेत. इतिहासात पाचवा सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरतो. त्याच्या पुढे आॅस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमन (२११५), इंग्लंडचे हर्बर्ट स्टक्लिफ (१६११ धावा), वेस्ट इंडिजचे इर्व्हटन विक्स (१५२०) आणि आर्थर मॉरीस (१४०८) हे फलंदाज आहेत.त्याने इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरोधात खेळलेल्या तीन मालिकांमध्ये धावांची शानदार सरासरी त्याला आयसीसी रँकिंगमध्ये झेप मिळवून देत आहे. सध्या तो चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे स्टिव्ह स्मिथ, केन विल्यम्सन आणि विराट कोहली आहे. आतापर्यंत या तिघांशिवाय जो रुट हे चार फलंदाजच मुख्य शर्यतीत मानले जात होते. लाबुशेनचे हे यश आॅस्ट्रेलियासाठी मोठे फायदेशीर ठरत आहे. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावरील बंदीनंतर आॅस्ट्रेलियाने संघर्ष केला. मात्र, आता आॅस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा आपली सरसता दाखवून देण्यास उत्सुक आहे. स्मिथ आणि वॉर्नर नसताना आॅस्ट्रेलियाची फलंदाजी नक्कीच खडतर प्रसंगातून जात होती. मात्र, हे दोघेही पुनरागमनानंतर आपली शानदार कामगिरी करत आहेत. त्यांची धावांची भूक अजूनही कायम आहे.स्मिथ आणि लाबुशेन यांच्यातील ताळमेळ द्रविड आणि लक्ष्मण, सोबर्स आणि कन्हाई यांच्यासारख्या जोडीची आठवण करून देतो.(कन्सल्टिंग एडिटर लोकमत)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- लाबुशेन कसोटी क्रिकेटमधील अव्वल खेळाडू
लाबुशेन कसोटी क्रिकेटमधील अव्वल खेळाडू
वर्षभरापूर्वी मार्नस लाबुशेन याने दुबई येथे झालेल्या पाकिस्तानविरोधात कसोटी क्रिकेटमध्ये पर्दापण केले.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 5:52 AM