नवी दिल्ली : एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट विश्वचषकाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. मात्र, क्रिकेटविश्वातील या सर्वोच्च स्पर्धेदरम्यान जवळपास सर्वच संघांना आपल्या स्टार खेळाडूंच्या दुखापतींनी ग्रासले आहे. हे स्टार खेळाडू यंदाच्या विश्वचषकाला मुकणार असल्याने सर्वच संघांची समीकरणे बदलली. २८ सप्टेंबरला सर्व अंतिम संघ जाहीर झाले. त्यानंतर दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडलेल्यांची माहिती स्पष्ट झाली.
विश्वचषकाला मुकणारे स्टार क्रिकेटपटू
ऋषभ पंत (भारत, रस्ते अपघातात जखमी)
अक्षर पटेल (भारत, बोटाची दुखापत)
नसीम शाह (पाकिस्तान, खांदादुखी)
जोफ्रा आर्चर (इंग्लंड, उजवा कोपरा फ्रॅक्चर)
वानिंदू हसरंगा (श्रीलंका, मांडीची दुखापत)
ॲन्रीच नॉर्खिया (दक्षिण आफ्रिका,
उजव्या अंगठ्याची आणि कंबरेची दुखापत)
सिसंदा मगला (दक्षिण आफ्रिका, डाव्या
गुडघ्याची दुखापत)
तमिम इक्बाल (बांगलादेश, पाठदुखी)
इबादत हुसैन (बांगलादेश, गुडघ्याची शस्त्रक्रिया)
मायकल ब्रेसवेल (न्यूझीलंड, पायाची दुखापत)
जेसन रॉय (इंग्लंड, पाठदुखी)