- अयाझ मेमन
(कन्सल्टिंग एडिटर लोकमत)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह बाहेर पडला. आगामी बांगलोदशविरुद्धच्या मालिकेतही त्याची खेळण्याची शक्यता कमीच आहे. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यासाठी मात्र हा मोठा काळजीचा विषय असेल. बुमराहची उणीव ही भासेलच; कारण दर्जे$$दार गोलंदाज हा प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत असतो. दक्षिण आफ्रिकेने तसा अनुभव घेतलेला आहे. हा संघ एबी डिव्हिलियर्स, हाशिम आमला आणि जेपी ड्युमिनी यांच्या निवृत्तीनंतर प्रथमच भारतात कसोटी मालिका खेळत आहे. बुमराह नसल्याचा त्यांना थोडा फायदा होईल. ड्युुप्लेसिस आणि क्विंटन डी कॉक हे चांगले भरात आहेत. त्यांना बुमराहच्या क्षमतेची जाणीव होती. याचा किंचित फायदा ते उठविण्याचा प्रयत्न करतील.
दुसरीकडे विराट कोहलीच्या मनात नाराजीची भावना असेल. भारतीय गोलंदाजी सध्या जगातील गोलंदाजी आक्रमणाच्या तुलनेत उत्तम आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकासुद्धा दर्जेदार जलदगती गोलंदाज आणि फिरकीपटूंसह खेळण्याचा प्रयत्न करील.
वेस्ट इंडिज दौºयात शमी आणि ईशांत हे भारताचे प्रभावी गोलंदाज ठरले. उमेश यादवने आपली जागा थोडी दूर नेली. भारतीय जलदगती गोलंदाजांमध्ये जी स्पर्धा सुरू आहे, ती गंभीर स्वरूपाची आहे, याचा फायदा संघाला होतो.
भारतीय खेळपट्टीवर फिरकी मारा अधिक प्रभावी ठरत आहे. कसोटीत रवींद्र जडेजा, आर. आश्विन हे गेल्या काही वर्षांपासून भारताचे स्टार गोलंदाज ठरले आहेत. त्यांनी तसे सिद्ध केले आहे. प्रत्येकी पातळीवर ते बळी मिळवीत आहेत. आता सर्वाधिक दबाव असेल तो भारतीय फलंदाजांवर. आघाडीची फळी अपयशी होत आहे. विराटच्या प्रयत्नांनंतरही भारताला २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करता आले नाही. त्याच वर्षी इंग्लंडमध्ये गोलंदाजांच्या शानदार प्रदर्शनानंतरही भारत पराभूत झाला होता. एम. विजय, शिखर धवन आणि के. एल. राहुल हे गेल्या काही वर्षांपासून भारताची सुरुवात करीत आहेत. मयंक अग्रवालने विश्वास दाखविला खरा; पण त्यालाही स्थान अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या खेळी कराव्या लागतील. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. त्याच्यात तशी प्रतिभा आहे. त्याच्यासाठी ही मोठी संधी असेल.
युवा वृषभ पंत याच्यावर नजरा असतील. त्याच्यात नैसर्गिक आक्रमक खेळ आहे; पण गेल्या काही सामन्यांत तो ज्या पद्धतीने चुका करीत आला आहे, याचा विचार रवी शास्त्री नक्की करतील.
Web Title: Lack of Virat Bhusal Bumrah
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.