नवी दिल्ली : भारताचा संघ आता विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. २२ मे रोजी भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. भारताचा संघ समतोल असल्याचे बरेच जण म्हणत असले तरी या संघात उणीव असल्याचे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला वाटत आहे. त्यामुळे भारताचा संघ विश्वचषकासाठी समतोल नसल्याचे गंभीरने म्हटले आहे.
गंभीर म्हणाला की, " हा विश्वचषक पाहायला मजा येईल. कारण प्रत्येक संघ एकमेकांशी भिडणार आहे. त्यामुळे या विश्वचषकात प्रत्येक संघाची सत्वपरीक्षा असेल. या विश्वचषकाचे भारत, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे प्रबळ दावेदार असतील. पण भारतीय संघातील एक कमतरता संघासाठी धोकादायक ठरू शकते."
भारताच्या संघाबाबत गंभीर म्हणाला की, " इंग्लंडचे वातावरण आणि खेळपट्ट्या या भारतापेक्षा नक्कीच वेगळ्या आहेत. भारतीय संघात जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे तीन वेगवान गोलंदाज आहेत. पण त्यांना साथ देण्यासाठी संघात चौथा वेगवान गोलंदाज असायला हवा होता. संघात हार्दिक पंड्या आणि विजय शंकर हे अष्टपैलू खेळाडू आहेत. पण तरीही संघाला चौथा वेगवान गोलंदाज असायला हवा होता."
रिषभ पंत विश्वचषकाच्या संघात का नाही, सांगतोय विराट कोहली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात रिषभ पंतचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला. महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून रिषभचे नाव आघाडीवर असताना निवड समितीने दिनेश कार्तिकच्या नावाची निवड केली. रिषभ हा 21 वर्षांचा आहे आणि त्याला भविष्यात वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याची संधी मिळू शकते. तसेच इंग्लंडमध्ये अनुभवी खेळाडूची आवश्यकता असल्याने कार्तिकची निवड करण्यात आल्याचे निवड समिती प्रमुखे एमएसके प्रसाद यांनी सांगितले. त्यामुळे या चर्चेवर पडदा पडला होता. पण आता तर संघाचा कर्णधार विराट कोहलीने पंत संघात का नाही, याचे कारणही दिले आहे.
२०१९ मध्ये भारतात लोकसभेच्या निवडणुकीत काय होणार, याची जेवढी उत्सुकता देशवासीयांना आहे, साधारण तितकीच उत्कंठा यावर्षी इंग्लंडमध्ये काय होणार याचीही आहे. यंदाचा क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेटच्या पंढरीत होतोय. १९८३ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारतानं पहिल्यांदा जगज्जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्याची पुनरावृत्ती विराटसेनेनं करावी, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. पण हे 'मिशन' अजिबातच सोपं नाही. एकापेक्षा एक तगडे प्रतिस्पर्धी या रणांगणात उतरणार आहेत. त्यांना टक्कर देऊ शकणारे १५ वीर भारताने काल निवडलेत. अनुभवी शिलेदार आणि नव्या दमाचे भिडू असा समन्वय साधायचा निवड समितीने प्रयत्न केलाय आणि तो बऱ्याच अंशी यशस्वीही झाल्याची चर्चा आहे. पण, या नव्या भिडूंमध्ये एक जिगरबाज युवा खेळाडू नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. हा तरुण वीर म्हणजे, रिषभ पंत.यष्टिरक्षक म्हणून निवड समितीने महेंद्रसिंग धोनीसोबतदिनेश कार्तिकला पसंती दिल्यानं पंतचं तिकीट कापलं गेलं. पण, 'पंतां'ची निवड वर्ल्ड कपसाठी झाली नाही, हे बरंच झालं. कारण, संघात न झालेला समावेश त्याच्या कारकिर्दीसाठी फायद्याचा ठरू शकतो.