एका बाजूला आयपीएल २०२५ मेगा लिलावाची चर्चा सुरु असताना इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी चेन्नई सुपर किंग्ससंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. चेन्नई सुपर किंग्सचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि सचिव एन. श्रीनिवासन अंपायर्संना फिक्स करायचे, असा गंभीर आरोप ललित मोदींनी केलाय.
लिलावात खेळाडूला आपल्या चंबूत घेण्यासाठी फिक्सिंगचा खेळ?
आयपीएलच्या मेगा लिलावानंतर ललित मोदींनी स्फोटक मुलाखतीनं लक्षवेधून घेतले आहे. लिलावावेळीही एन श्रीनिवासन फिक्सिंग करताना पाहिले आहे. त्याच्यासोबत शत्रूत्व निर्माण झाले, असा दावाही त्यांनी केलाय. लिलावासंदर्भातील गोष्ट शेअर करताना ललित मोदी म्हणाले की, २००९ च्या लिावात इंग्लंडच्या अँड्रू फ्लिटॉफला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी श्रीलंकन तिसारा परेराला चेन्नईच्या यादीतून बाहेर करण्यास सांगितले होते. या लिलावात अँड्रू फ्लिंटॉफसाठी चेन्नई सुपर किंग्सनं ७ कोटी ५० लाख रुपये मोजून आपल्या संघात घेतले होते. श्री. निवासन यांच्या सांगण्यावरून अन्य फ्रँचायझींनी त्याच्यावर अधिक बोली लावू नये, अशी सुचना आपण दिली होती, असे ललित मोदींनी म्हटले आहे.
शेअर केला अंपार्यसोबतच्या सेटिंगचाही किस्सा आयपीएलच्या नियोजनासंदर्भातील गप्पा गोष्टी करताना ललित मोदी पुढे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात श्रीनिवासन यांना आयपीएलच्या यशाबद्दल संभ्रम होता. श्रीनिवासन चेन्नई सुपर किंग्सच्या बाजून निर्णय देण्यासाठी अंपार्यसोबतही सेटिंग करायचे. आपण याला अप्रत्यक्षरित्या फिक्सिंग म्हणतो, असा खळबळजन दावाही त्यांनी केला. आमच्यात दुश्मनी निर्माण झाल्यावर ते जी गोष्ट करत होते तोच आरोप माझ्यावर करण्यात आला.
CSK च्या सामन्यासाठी निवडले जायचे चेन्नईचे अंपायर्स
आयपीएलमधील CSK च्या सामन्यासाठी चेन्नईचे अंपायर्स निवडले जायचे. सुरुवातीच्या काळात मी यावर फार विचार केला नाही. पण ज्यावेळी गोष्ट लक्षात आली त्यावेळी हा प्रकार अप्रत्यक्षरित्या फिक्सिंगचा आहे, असे म्हणत मी त्यांना विरोध केला होता. तेव्हापासून ते माझे विरोधक झाले, असा दावाही ललित मोदी यांनी केला आहे.
IPL मधील यशस्वी संघावर झाली होती दोन वर्षांच्या बंदीची कारवाई
चेन्नई सुपर किंग्सच्या संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यांनी पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर राजस्थान रॉयल्स संघासह चेन्नई सुपर किंग्सच्या संघावरही बंदीची कारवाई झाली होती.