सुनील गावस्कर लिहितात...
दुस-या कसोटीत लंकेला नमविण्यास भारत पुन्हा सज्ज झाला आहे. पहिल्या कसोटीत उपाहारानंतरच्या खेळात शिखर धवन याने आक्रमक फलंदाजीच्या बळावर लंकेवर वर्चस्व गाजवून दिले. त्यामुळेच सामना लंकेच्या हातून निसटला होता.
दुसरीकडे चेतेश्वर पुजाराची भूमिका दोन वर्षांपासून फलंदाजीत सुरळीतपणा आणण्यासाठी सेतूसारखी राहिली आहे. पुजाराच्या ठोस फलंदाजीमुळे सहकारी फलंदाजाला देखील स्ट्रोक्स खेळण्याचा आत्मविश्वास येतो. एक टोक पुजारा सांभाळेल याबद्दल विश्वासही असतो. द्रविड अशीच भूमिका वठवायचा. पण द्रविडच्या भूमिकेचे महत्त्व पुजाराला दिले जात नाही. झटपट गडी बाद झाले तरी पुजारा अन्य गोलंदाजांना त्रास होऊ नये म्हणून नवा चेंडू जुना होईस्तोवर खेळपट्टीवर स्थिरावून खेळत असतो. त्याचा भक्कम बचाव गोलंदाजांमध्ये नैराश्य आणू शकतो. गोलंदाज मग दुसºया टोकावर असलेल्या फलंदाजांना लक्ष्य करतात. पुजाराला भारताच्या भक्कम फलंदाजी फळीचा लाभदेखील मिळत आहे. त्याच्यानंतर येणारे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यास सक्षम आहेत, याची त्याला जाणीव झाली. आता तो स्वत:देखील मोठी फटकेबाजी करण्याच्या इराद्यानेच खेळतो. उद्याचा सामना पुजारासाठी विशेष असेल. ही त्याची ५० वी कसोटी आहे. विशेष सामन्यात मोठी खेळी करण्याचा त्याचा निर्धार आहे.
हार्दिक पांड्या याने परिचित शैलीत फटकेबाजी करीत कसोटी पदार्पण केले. त्याने गडीदेखील बाद केला. पण तरीही कोहली त्याच्याकडे लवकर चेंडू सोपविणार नाही. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतरच पांड्याला गोलंदाजी सोपविली जाईल. प्रतिस्पर्धीचा डाव लांबला तरी पांड्या अधिक षटके मारा करू शकतो. यजमान संघापुढे अनेक अडचणी आहेत. भारतापुढे आव्हान उभे करण्यासाठी लंकेला मोठ्या सर्जरीची गरज असेल. सलामीवीर संघर्ष करीत आहेत. तथापि, दिनेश चांदीमल आणि लाहिरू थिरिमाने यांच्या पुनरागमनामुळे संघात थोडी बळकटी आली आहे. तरीही गोलंदाजीत अधिक भेदकता आणण्याची गरज आहे. नुवान प्रदीपने पहिल्या सामन्यात सहा गडी बाद केले होते. त्याला दुसºया गोलंदाजांची मात्र साथ लाभली नाही. कोलंबोत २० बळी घेणारे गोलंदाज लागतील. भारताची कमकुवत कामगिरी झाली तरच लंकेच्या गोलंदाजांसाठी हे काम सोपे होईल. भारताचा सध्याचा फॉर्म पाहता हे शक्य नाही. अशा वेळी दुसरा सामना देखील चार दिवसांत संपेल, हे शक्य आहे. (पीएमजी)
Web Title: Lanka needs big 'surgery'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.