४० वर्षीय शोएब मलिकने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, आशियातील पहिला फलंदाज ठरला

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर शोएब मलिकने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला आहे. शोएब सध्या लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये जाफना किंगकडून खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:46 PM2022-12-15T12:46:21+5:302022-12-15T12:46:35+5:30

whatsapp join usJoin us
Lanka Premier League 2022: Shoaib Malik becomes 2nd after Chris Gayle to score 12000 runs in T20s | ४० वर्षीय शोएब मलिकने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, आशियातील पहिला फलंदाज ठरला

४० वर्षीय शोएब मलिकने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, आशियातील पहिला फलंदाज ठरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर शोएब मलिकने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला आहे. शोएब सध्या लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये जाफना किंगकडून खेळत आहे. १२ डिसेंबर रोजी कोलंबो स्टार्स विरुद्धच्या सामन्यात शोएबने आपल्या ट्वेंटी-२० कारकिर्दीतील १२ हजार धावा पूर्ण केल्या. या सामन्यात मलिकने २६ चेंडूत ३५ धावांची धडाकेबाज खेळी खेळली, ज्यात त्याने ५ चौकार लगावले. ट्वेंटी-२० कारकिर्दीत १२००० धावा पूर्ण करणारा मलिक हा पाकिस्तानचा एकमेव क्रिकेटर आहे, तर १२००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. सध्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने १४५६२ धावा केल्या आहेत.


शोएब मलिक हा आशियातील पहिला क्रिकेटपटू आहे की ज्याच्या नावावर ट्वेंटी-२०  क्रिकेटमध्ये १२ हजारांहून अधिक धावा झाल्या आहेत.  नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मलिकचा पाकिस्तान संघात समावेश नव्हता. त्यामुळे बराच गदारोळ झाला होता. पाकिस्तानी दिग्गजांनी पाकिस्तानी संघ व्यवस्थापनावर पाकिस्तानी संघात सामील न झाल्याबद्दल टीका केली. इतकंच नाही तर शोएब चांगलाच संतापला होता. पण या सगळ्यानंतरही शोएब फ्रँचायझी क्रिकेट खेळत आहे. आता लंका प्रीमियर लीगमध्ये मलिकने आपली फलंदाजी जिवंत ठेवली आहे. 

कोलंबो स्टार्स विरुद्धच्या सामन्याबद्दल जाफना किंग्जने २० षटकांत ५ विकेट गमावत १७८ धावा केल्या, त्यानंतर कोलंबो स्टार्स संघ २० षटकांत ८ बाद १७२ धावाच करू शकला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: Lanka Premier League 2022: Shoaib Malik becomes 2nd after Chris Gayle to score 12000 runs in T20s

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.