पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर शोएब मलिकने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला आहे. शोएब सध्या लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये जाफना किंगकडून खेळत आहे. १२ डिसेंबर रोजी कोलंबो स्टार्स विरुद्धच्या सामन्यात शोएबने आपल्या ट्वेंटी-२० कारकिर्दीतील १२ हजार धावा पूर्ण केल्या. या सामन्यात मलिकने २६ चेंडूत ३५ धावांची धडाकेबाज खेळी खेळली, ज्यात त्याने ५ चौकार लगावले. ट्वेंटी-२० कारकिर्दीत १२००० धावा पूर्ण करणारा मलिक हा पाकिस्तानचा एकमेव क्रिकेटर आहे, तर १२००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. सध्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने १४५६२ धावा केल्या आहेत.
कोलंबो स्टार्स विरुद्धच्या सामन्याबद्दल जाफना किंग्जने २० षटकांत ५ विकेट गमावत १७८ धावा केल्या, त्यानंतर कोलंबो स्टार्स संघ २० षटकांत ८ बाद १७२ धावाच करू शकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"