Babar Azam - पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने आशिया चषक व वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी लंका प्रीमिअर लीगमध्ये ( Lanka Premier League ) खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने आज कोलंबो स्ट्रायकर संघाकडून खणखणीत शतक झळकावले आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमधील युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा तो जगातला दुसरा फलंदाज ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना गाले टायटन्सने ३ बाद १८८ धावा केल्या. लसिथ क्रूस्पूल ( ३६) व शेव्हॉन डॅनिएल ( ४९) यांनी संघाला चांगली सलामी करून दिली. भानुका राजपक्षा ( ३०) यानेही चांगला खेळ केला. टीम सेइफर्टने ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा केल्या. स्ट्रायकरच्या नसीम शाह, रमेश मेंडीस व लक्षण संदकन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरात, पथून निसंका व बाबर आजम यांनी स्फोटक खेळी केली. दोघांनी १२.३ षटकांत १११ धावांची भागीदारी केली. निसंका ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावा केल्या. त्यानंतर स्ट्रायकरचा नुवानिंदू फर्नांडो ( ८) लगेच बाद झाला. पण, बाबरने मोर्चा सांभाळला. त्याने ५९ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १०४ धावांची खेळी केली. ट्वेंटी-२०क्रिकेटमधील हे त्याचे १०वे शतक ठरले अन् १० किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला.
ट्वेंटी-२०त सर्वाधिक शतक
२२ - ख्रिस गेल
१० - बाबर आजम
८ - आरोन फिंच, मिचेल क्लिंगर, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर
Web Title: Lanka Premier League- Babar Azam becomes only the 2nd batter in history after Chris Gayle to reach 10 T20 centuries, he smashed 104 runs from 59 balls with 8 fours & 5 sixes, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.