Babar Azam - पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने आशिया चषक व वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी लंका प्रीमिअर लीगमध्ये ( Lanka Premier League ) खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने आज कोलंबो स्ट्रायकर संघाकडून खणखणीत शतक झळकावले आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमधील युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा तो जगातला दुसरा फलंदाज ठरला आहे.
प्रत्युत्तरात, पथून निसंका व बाबर आजम यांनी स्फोटक खेळी केली. दोघांनी १२.३ षटकांत १११ धावांची भागीदारी केली. निसंका ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावा केल्या. त्यानंतर स्ट्रायकरचा नुवानिंदू फर्नांडो ( ८) लगेच बाद झाला. पण, बाबरने मोर्चा सांभाळला. त्याने ५९ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १०४ धावांची खेळी केली. ट्वेंटी-२०क्रिकेटमधील हे त्याचे १०वे शतक ठरले अन् १० किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला.