Join us  

आता भारताकडून खेळू शकतो लसिथ मलिंगा...?

आता श्रीलंकेकडून निवृत्ती पत्करल्यावर मलिंगा भारताकडून खेळणार का, असे तुम्हाला वाटले असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 5:54 PM

Open in App

मुंबई : श्रीलंकेचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगानं  आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटला रामराम केला. बांगदालेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर त्यानं निवृत्ती घेतली, तशी घोषणा त्यानं आधीच केली होती. श्रीलंकेनेही त्याला विजयी निरोप दिला. पण, गेली अनेक वर्ष जगभरातील गोलंदाजांना प्रेरित करणाऱ्या मलिंगाची मोहिनी अजूनही कायम आहे. पण आता श्रीलंकेकडून निवृत्ती पत्करल्यावर मलिंगा भारताकडून खेळणार का, असे तुम्हाला वाटले असेल.

अखेरच्या सामन्यानंतर मलिंगा म्हणाला,''संपूर्ण कारकिर्दीत मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. युवा गोलंदाजही अशीच कामगिरी करतील, अशी आशा आहे. भविष्यात मला हेच अपेक्षित आहे. या युवा गोलंदाजांकडून मॅच विनिंग कामगिरी मला पाहायची आहे. देशासाठी 15 वर्ष खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.  2023च्या वर्ल्ड कपच्या दृष्टीनं संघबांधणीला आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे माझ्या निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. युवा खेळाडूंना पुरेसा अनुभव मिळायला हवा.''

पण श्रीलंकेला सोडून मलिंगा भारतासाठी खेळणार का, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तसे नक्कीच नाही. आता संघाकडून संधी मिळू शकते ती भारताच्या लसिथ मलिंगाला. तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये जी पेरियास्वामी हा देसी मलिंगा भारताला सापडला आहे. सध्या त्याच्याच गोलंदाजीची चर्चा आहे आणि एका  सामन्यात त्याचा यॉर्कर पाहून मलिंगाची आठवण होण्यापासून स्वतःला रोखणं, कोणत्याही क्रिकेटपटूला जमणार नाही. जी पेरियास्वामी हा तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये चेपॉक सुपर गिल्‍लीजकडून खेळतो. या लीगच्या अंतिम फेरीत पेरियास्वामीने चार षटकांमध्ये १५ धाव देत पाच बळी मिळवले होते. त्यानंतर पेरियास्वामी हे नाव बहुतांशी चाहत्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर जेव्हा पेरियास्वामीची गोलंदाजी शैली आणि यॉर्कर टाकण्याची पद्धत बघितली तर ती लसिथ मलिंगासारखीच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पेरियास्वामीला भारताचा मलिंगा, असेही संबोधण्यात येत आहे.

 

हा पाहा व्हिडीओ

सध्याच्या घडीला भारतीय संघ युवा खेळाडूंच्या शोधात आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरही युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे. त्यामुळे पेरियास्वामी जर आयपीएल किंवा तामिळनाडूच्या संघाकडून खेळला आणि त्याने जर चमकदार कामगिरी केली तर त्याला भारतीय संघाचे दरवाजे खुले होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

टॅग्स :लसिथ मलिंगाभारतश्रीलंका