कोलंबो : भारताविरुद्ध २० डिसेंबरपासून प्रारंभ होणा-या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज लसित मलिंगाला श्रीलंका संघात स्थान मिळालेले नाही.
क्रीडामंत्री धनंजय जयसेकरा यांची मंजुरी मिळाल्यानंतर संघ जाहीर करण्यात आला. त्यात मलिंगाला विश्रांती देण्यात आली असल्याचे म्हटले आहे, पण त्यासाठी कुठलेही कारण देण्यात आलेले नाही. मलिंगा बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळत आहे. सीनिअर खेळाडू सुरंगा लकमल व लाहिरू थिरिमाने यांना विश्रांती देण्यात आली आहे. विश्व फर्नांडो व दासुन शनाका यांची त्यांच्या जागी निवड करण्यात आली.
पहिला टी-२० सामना २० डिसेंबर रोजी कटकमध्ये खेळल्या जाणार आहे. त्यानंतर २२ डिसेंबरला इंदूरमध्ये दुसरा तर २४ डिसेंबरला मुंबईमध्ये तिसरा सामना होईल. (वृत्तसंस्था)
श्रीलंका संघ
थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुलास परेरा, दनुष्का गुणतिलक, निरोशन डिकवेला, असेला गुणरत्ने, सदीरा समरविक्रम, दासुन शनाका, चतुरंगा डिसिल्वा, सचित पतिराणा, धनंजय डिसिल्वा, नुवान प्रदीप, विश्व फर्नांडो, दुशमंत चमिरा.
Web Title: Lasith Malinga is out of the team; Laxman rest; T20 series against India on December 20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.