कोलंबो, दि. 01: भारताविरुद्धच्या मालिकेनंतर असल्याचे लंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने सांगितले. खराब कामगिरी होताच निवृत्तीची घोषणा करेन, असेही मलिंगा म्हणाला.मलिंगाने काल चौथ्या वन डेत विराट कोहलीला बाद करीत ३०० वा बळी घेतला. भारताने हा सामना १६८ धावांनी जिंकून मालिकेत ४-० अी आघाडी मिळविली आहे. सामन्यानंतर मलिंगा म्हणाला,‘पायाच्या दुखापतीमुळे १९ महिन्यानंतर मी खेळत आहे. झिम्बाब्वे आणि आता भारताविरुद्ध कामगिरी चांगली झालेली नाही.या मालिकेनंतर पुढे खेळण्याबाबत विचार करणार आहे. संघासाठी सामने जिंकत नसेल तर खेळत राहण्यात काही अर्थ नाही. १९ महिन्यांची कसर भरून काढताना आधीच्या फॉर्ममध्ये परतण्याचे माझ्यापुढे आव्हान आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील भागीदारीमुळे भारताने आमच्याकडून सामना हिसकावल्याचे सांगून मलिंगा पुढे म्हणाला,‘दोघांनीही दणादण फटकेबाजी केली. आम्ही देखील गोलंदाजीत वेग आणि लय कायम राखू शकलो नाही.अशाप्रकारच्या खेळपट्टीवर लय कायम ठेवणे गरजेचे आहे. संघाला यावर ‘फोकस’ करावा लागेल. या सामन्यात खराब गोलंदाजीनंतर आमच्याकडे अँजेलो मॅथ्यूज हाच एकमेव अनुभवी फलंदाज होता. अन्य युवा फलंदाजांना अनुभव मिळविण्यास वेळ लागणार आहे. सध्या सर्वजण शिकण्याच्या स्थितीत असल्याने सर्वांच्या खेळात आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो, असे मलिंगाने फलंदाजांच्या अपयशाविषयी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारताविरुद्ध मालिका संपताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू ठेवायचे की नाही, याचा निर्णय घेणार- लसिथ मलिंगा
भारताविरुद्ध मालिका संपताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू ठेवायचे की नाही, याचा निर्णय घेणार- लसिथ मलिंगा
भारताविरुद्धच्या मालिकेनंतर असल्याचे लंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने सांगितले. खराब कामगिरी होताच निवृत्तीची घोषणा करेन, असेही मलिंगा म्हणाला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 11:34 PM