India vs Australia, 2nd Test : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर आर अश्विनचा पराक्रम, १९८५/८६नंतर घडला हा विक्रम

टी ब्रेकनंतर ऑसींना एकामागून एक धक्के देताना आणखी तीन फलंदाज बाद केले. आर अश्विन, सिराज व बुमराह यांनी उल्लेखनीय गोलंदाजी केली.

By स्वदेश घाणेकर | Published: December 26, 2020 11:19 AM2020-12-26T11:19:12+5:302020-12-26T11:20:29+5:30

whatsapp join usJoin us
The last finger spinner before R Ashwin today to take three or more wickets on day one of a Test at the MCG was Ravi Shastri in 1985/86 | India vs Australia, 2nd Test : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर आर अश्विनचा पराक्रम, १९८५/८६नंतर घडला हा विक्रम

India vs Australia, 2nd Test : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर आर अश्विनचा पराक्रम, १९८५/८६नंतर घडला हा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 2nd Test :  विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थिती टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेनं ( Ajinky Rahane) ऑस्ट्रेलियाला नेतृत्वकौशल्यानं सर्वांना चकित केलं. गोलंदाजांचा योग्य वापर करताना त्यानं ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. ऑसींचा निम्मा संघ १३६ धावांवर माघारी पाठवून टीम इंडियानं सामन्यावरील पकड मजबूत केली. पदार्पणवीर मोहम्मद सिराजनं प्रभावित केले, आर अश्विननं ऑसींचे कंबरडे मोडले. अश्विननं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या या कसोटीत पहिल्याच दिवशी विक्रमी कामगिरी केली. १९८५/८६साली रवी शास्त्री यांनी असा पराक्रम केला होता. 

जसप्रीत बुमराहनं पाचव्या षटकात ऑसींना पहिला धक्का दिला. जो बर्न्स त्यानं ( ०) यष्टिरक्षक रिषभच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले. बर्न्स माघारी परतला तरी मॅथ्यू वेड आक्रमक खेळ करत होता. अजिंक्यनं फिरकीपटू आर अश्विनला ( R Ashwin) आणले आणि त्याचा हा डाव यशस्वी ठरला. अश्विननं १३व्या षटकात ऑसींचा सलामीवीर मॅथ्यू वेडला ( ३०) माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर अश्विननं स्टीव्ह स्मिथला फोडू न देताच तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजारानं त्याचा झेल टिपला. ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ३८ अशी झाली होती. पण, लाबुशेन व हेड यांनी डाव सावरला. 

खेळपट्टीचा बदललेला अंदाज पाहता कर्णधार अजिंक्यनं पुन्हा बुमराहच्या हाती चेंडू सोपवला आणि त्याचा हाही डाव यशस्वी ठरला. बुमरानं हेडला ( ३८) माघारी जाण्यास भाग पाडले. अजिंक्यनं स्लीपमध्ये सुरेख झेल टिपटून हेड व लाबुशेन यांची ८६ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. मोहम्मद सिराजनं पदार्पणात पहिली विकेट घेतली. लाबुशेनला ४८ धावांवर त्यानं शुबमन गिलकरवी झेलबाद केले. दोन्ही पदार्पणवीरांनी टीम इंडियाला हे यश मिळवून दिलं. सिराजच्या या विकेटनं ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १३६ अशी झाली.

टी ब्रेकनंतर ऑसींना एकामागून एक धक्के देताना आणखी तीन फलंदाज बाद केले. आर अश्विन, सिराज व बुमराह यांनी उल्लेखनीय गोलंदाजी केली. अश्विननं टीम पेनला बाद करून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. पहिल्या दिवसातील ही त्याची तिसरी विकेट ठरली. ऑस्ट्रेलियात कसोटीत सर्वाधिकवेळा ३ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याचा विक्रम अश्विननं ( ८ वेळा) नावावर केला. त्यानं अनिल कुंबळेचा ( ७ वेळा) विक्रम मोडला. शिवाय मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी तीन किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची ही १९८५/८६ ची पहिलीच वेळ. याआधी रवी शास्त्री यांनी हा पराक्रम केला होता. 


 

Web Title: The last finger spinner before R Ashwin today to take three or more wickets on day one of a Test at the MCG was Ravi Shastri in 1985/86

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.