इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या गुणतालिकेत बरेच बदल पाहायला मिळत आहेत. कोलकाता नाइट रायडर्सनं आज दिल्ली कॅपिटल्सला बेकार हरवले. या विजयानंतर कोलकातानं १० गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातला सामना सुरू असताना बीसीसीआयनं मोठे अपडेट्स दिले आहेत. चेन्नई सुपर किंग्स ( १६ ) व दिल्ली कॅपिटल्स ( १६) गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. RCB १२ गुणांसह तिसऱ्या, तर KKR १० गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या चाहत्यांसाठी हे अपडेट्स जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहेत.
आयपीएल २०२१च्या साखळी फेरीतील शेवटचे दोन सामने एकाच वेळी म्हणजे सायंकाळी ७.३० वाजता खेळवण्यात येणार आहेत. आधीच्या वेळापत्रकानुसार 8 ऑक्टोबरला सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स हा सामना दुपारी 3.30 वाजल्यापासून, तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि. दिल्ली कॅपिटल्स हा सामना सायंकाळी 7.30 वाजल्यापासून सुरू होणार होते. पण, आता दोन्ही सामने सायंकाळीच खेळवले जातील.
सुधारित वेळापत्रक
29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सायं. 7.30 वाजल्यापासून
30 सप्टेंबर - सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
1 ऑक्टोबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. पंजाब किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
2 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
3 ऑक्टोबर - पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दुपारी 3.30 वाजल्यापासून
3 ऑक्टोबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून
4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि, चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
5 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
6 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून
7 ऑक्टोबर - चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून
7 ऑक्टोबर - कोलकाता नाइट रायडर्स वि राजस्थान रॉयल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
8 ऑक्टोबर - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
8 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि. दिल्ली कॅपिटल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून
10 ऑक्टोबर - क्वालिफायर, सायं. 7.30 वाजल्यापासून
11 ऑक्टोबर - एलिमिनेटर, सायं. 7.30 वाजल्यापासून
13 ऑक्टोबर - क्वालिफायर 2, सायं. 7.30 वाजल्यापासून
15 ऑक्टोबर- फायनल, सायं. 7.30 वाजल्यापासून
Web Title: The last two league matches of IPL 2021 will be played at the same time 7:30 IST i.e. MI vs SRH & RCB vs DC
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.