Join us  

IND vs WI:भारत आणि वेस्टइंडिजमधील शेवटचे २ सामने अमेरिकेतच; रोहित शर्माही झाला फिट

सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 11:44 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक खुशखबर समोर आली आहे. कारण भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील टी-२० मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत पार पडणार आहेत. मागील काही दिवसांपासून खेळाडूंचा रखडलेला व्हिसा अखेर आला आहे. म्हणजेच आता पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील उर्वरीत दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवले जातील. 

तसेच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील फिट झाला आहे. त्यामुळे आगामी दोन टी-२० सामन्यात तो पुन्हा एकदा भारतीय संघाची धुरा सांभाळेल. रोहितला मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती, त्यामुळे त्याच्या खेळीवर प्रश्न उपस्थित झाला होता. खरं तर पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेवर कब्जा करण्यापासून भारतीय संघ केवळ एक पाऊल दूर आहे. 

अमेरिकेत होणार निर्णायक सामनेभारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधील टी-२० मालिकेचे पहिले ३ सामने विंडीजच्या धरतीवर पार पडले. आता उर्वरीत दोन सामने अमेरिकेच्या धरतीवर अनुक्रमे ६ आणि ७ ऑगस्ट रोजी खेळवले जातील. दोन्ही संघातील खेळाडूंचा व्हिसा आला नसल्यामुळे या सामन्यांमध्ये बाधा आली होती, परंतु आता व्हिसाची सर्व कागदपत्रे आली असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत गयानाच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे दोन्ही संघांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला आहे.

क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, बयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि भारतीय खेळाडूंसह वेस्टइंडिजच्या खेळाडूंना आणि स्टाफला व्हिसा मिळाला आहे. यासाठी वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाने (CWI) राष्ट्राध्यक्षांचे आभार देखील मानले. राष्ट्राध्यक्ष यांनी केलेला हा प्रयत्न सामाजिकदृष्या प्रभावी असल्याचे मंडळाने म्हटले आहे. 

टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघभारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

वेस्टइंडिजचा संघ - निकोलस पूरन (कर्णधार), रोवमॅन पॉवेल, शमराह ब्रूक्स, डोमिनिक ड्रेक, शिमरन हेटमायर, जेसन होल्डर, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, कायल मेयर्स, ओबेड मॅकॉय, किमो पॉल, रोमिरियो शेफर्ड, ओडिन स्मिथ, डेवॉन थॉम, हेडेन वॉल्श ज्युनिअर. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारतवेस्ट इंडिजटी-20 क्रिकेटरोहित शर्माअमेरिका
Open in App