Join us  

गेल्या वर्षभरात फक्त एकच भारतीय क्रिकेटपटू डोपिंगमध्ये सापडला

पण त्या खेळाडूनेही जाणूनबुजून उत्तेजक द्रव्य घेतले नव्हते, तर त्या खेळाडूने खोकल्याचे एक औषध घेतले होते, यामध्ये उत्तेजक द्रव्य आढळले आणि त्यामुळेच त्याला डोपिंगमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 8:59 PM

Open in App
ठळक मुद्देबीसीसीआयने पाच महिन्यांसाठी त्याचे निलंबन केले होते.

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला प्रत्येक खेळामध्ये डोपिंगचे प्रमाण वाढलेले दिसते. पण भारतीय क्रिकेटमध्ये मात्र हे प्रमाण तुरळक आहे. कारण गेल्या वर्षभरात फक्त एकच क्रिकेटपटू डोपिंगमध्ये दोषी आढळला आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये फक्त एक खेळाडू वर्षभरात डोपिंगमध्ये दोषी ठरला. पण त्या खेळाडूनेही जाणूनबुजून उत्तेजक द्रव्य घेतले नव्हते, तर त्या खेळाडूने खोकल्याचे एक औषध घेतले होते, यामध्ये उत्तेजक द्रव्य आढळले आणि त्यामुळेच त्याला डोपिंगमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. 

गेल्या वर्षभरात डोपिंगमध्ये दोषी आढळलेला एकमेव क्रिकेटपटू आहे युसूफ पठाण. डोपिंगमध्ये दोषी आढळल्यावर युसूफवर बीसीसीआयने पाच महिन्यांसाठी त्याचे निलंबन केले होते. पण आयपीएलपूर्वी या पाच महिन्यांचा कालावधी संपला आणि त्यामुळेच युसूफला आयपीएलमध्ये खेळता आले. बीसीसीआयने युसूफवर 15 ऑगस्ट 2017 ते 14 जानेवारी 2018 या कालावधीत बंदी आणली होती.

टॅग्स :क्रिकेटयुसुफ पठाण