ICC T20I Ranking : विराट कोहली एक स्थान वर, तर रोहित शर्मा टॉप टेनमधून बाहेर

भारतीय संघानं नववर्षाच्या पहिल्याच ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 असा दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 01:51 PM2020-01-11T13:51:58+5:302020-01-11T13:52:30+5:30

whatsapp join usJoin us
Latest ICC T20I Ranking Virat Kohli Jumped to 9; Rohit Sharma out of top 10   | ICC T20I Ranking : विराट कोहली एक स्थान वर, तर रोहित शर्मा टॉप टेनमधून बाहेर

ICC T20I Ranking : विराट कोहली एक स्थान वर, तर रोहित शर्मा टॉप टेनमधून बाहेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघानं नववर्षाच्या पहिल्याच ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 असा दणदणीत विजय मिळवला. भारताच्या फलंदाजानंतर जलदगती गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानं लंकेला हादरे दिले. जसप्रीत बुमराह ( 1/5) , शार्दूल ठाकूर ( 2/19), वॉशिंग्टन सुंदर ( 2/37) आणि नवदीप सैनी ( 3/28) यांनी टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला. या सामन्यात शिखर धवन ( 52) आणि लोकेश राहुल ( 54) यांच्या अर्धशतकी खेळीसह कर्णधार विराट कोहलीनंही सहाव्य क्रमांकावर येत धावांत योगदान दिले. या योगदानाचा त्याला फायदा झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) ट्वेंटी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत विराट एक स्थान वर सरकला आहे, परंतु सध्या विश्रांतीवर असलेल्या रोहित शर्माला टॉप टेनमधून बाहेर जावे लागले आहे.

टीम इंडियाची पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी; पण, 'विराट'सेना लै भारी!

नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. शिखर धवन ( 52) आणि लोकेश राहुल ( 54)  यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना संघाला दमदार सुरुवात करुन दिली. कोहलीनं ( 26) सहाव्या क्रमांकावर येताना संघाचा डाव सावरला. त्याला मनीष पांडेची ( 31*) चांगली साथ मिळली आणि टीम इंडियानं मोठी धावसंख्या उभारली. भारतानं अखेरच्या 4 षटकांत 59 धावा चोपून काढल्या. शार्दूल ठाकूरनं 8 चेंडूंत नाबाद 22 धावा करून संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. भारतानं 20 षटकांत 6 बाद 201 धावा केल्या. प्रत्युत्तरात लंकेचा संपूर्ण संघ 123 धावांत माघारी परतला आणि टीम इंडियानं 78 धावांनी हा सामना जिंकला. 

या सामन्यातील कामगिरीच्या जोरावर विराटनं आयसीसी ट्वेंटी-20 फलंदाजांमध्ये दहाव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर आगेकूच केली आहे. रोहित मात्र नवव्या स्थानावरून 13व्या स्थानी गेला आहे. ट्वेंटी-20च्या टॉप टेन गोलंदज आणि अष्टपैलू खेळाडूंमध्ये एकही भारतीय नाही.
 

टॉप टेन फलंदाज
बाबर आझम ( पाकिस्तान) - 879 गुण
अॅरोन फिंच ( ऑस्ट्रेलिया ) - 810 गुण
डेवीड मलान ( इंग्लंड ) - 782 गुण
कॉलिन मुन्रो ( न्यूझीलंड) - 780 गुण
ग्लेन मॅक्सवेल ( ऑस्ट्रेलिया) - 766 गुण
लोकेश राहुल ( भारत ) - 760 गुण
एव्हिन लुइस ( वेस्ट इंडिज) - 699 गुण
हझरतुल्लाह जझाई ( अफगाणिस्तान) - 692 गुण
 विराट कोहली ( भारत) - 683 गुण
इयॉन मॉर्गन ( इंग्लंड) - 653 गुण
रोहित शर्मा ( भारत) - 646 गुण ( 13व्या स्थानी)
शिखर धवन ( भारत ) - 612 गुण ( 15व्या स्थानी) 

जसप्रीत बुमराहचा दे धक्का; आर अश्विन, चहल यांचा मोडला विक्रम

India vs Sri Lanka, 3rd T20I : विराटच्या नावावर लाखमोलाचा विक्रम, ठरला जगातला पहिला फलंदाज

विराट कोहलीचा World Record; पहिली धाव अन् कर्णधारांमध्ये पटकावलं मानाचं स्थान

India vs Sri Lanka, 3rd T20I : अंतिम सामन्यात टीम इंडियानं संघात केले तीन महत्त्वपूर्ण बदल 

India vs Sri Lanka, 3rd T20I : पुण्याचा इतिहास जाणून श्रीलंकेनं संधी साधली अन्...

India vs Sri Lanka, 3rd T20I : अखेर 1637 दिवसांनी 'हा' खेळाडू टीम इंडियाकडून खेळणार 

Web Title: Latest ICC T20I Ranking Virat Kohli Jumped to 9; Rohit Sharma out of top 10  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.