नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्त्व कौशल्याने सर्वांना प्रभावित केलेल्या हार्दिक पांड्याकडे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताचे कर्णधारपद सोपविण्याची अनेकांनी मागणी केली. मात्र, रोहित शर्माला कर्णधारपदावरुन इतक्यात दूर करण्याचा कोणताही विचार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. त्याचवेळी, टी-२० कर्णधार म्हणून हार्दिकचा पर्याय ठेवण्यात आल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले.एका संकेतस्थळाशी संवाद साधताना बीसीसीआय निवड समितीच्या एका सदस्याने सांगितले की, 'रोहित शर्माला कर्णधारपदावरुन दूर करण्याचा प्रश्नच येत नाही. पण त्याचवेळी, त्याच्यावरील कार्यभार कमी करणेही गरजेचे आहे. यासाठी हार्दिकचा पर्याय आमच्या योजनेमध्ये आहे. कारण, भविष्यात अनेक छोटे दौरे होणार असून, तो सध्या कसोटी संघाचा सदस्य नाही. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अनेक प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यात व्यस्त आहेत. त्यामुळेच हार्दिककडे भारताचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.'हार्दिकने यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे शानदार नेतृत्त्व करताना संघाला पदार्पणातच जेतेपद पटकावून दिले. यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्त्व हार्दिककडे सोपविण्यात यावे, असे मत व्यक्त केले. विरेंद्र सेहवागनेही असे मत व्यक्त करताना म्हटले होते की, 'रोहितवरील कार्यभार कमी करण्याच्या दृष्टिने हार्दिककडे कर्णधारपद सोपविण्याचा चांगला पर्याय बीसीसीआयकडे आहे.'
- Cricket Buzz»
- बातम्या»
- योजनेनुसार सोपविले हार्दिक पांड्याकडे नेतृत्व, भविष्यातील कर्णधाराचे दिले संकेत
योजनेनुसार सोपविले हार्दिक पांड्याकडे नेतृत्व, भविष्यातील कर्णधाराचे दिले संकेत
एका संकेतस्थळाशी संवाद साधताना बीसीसीआय निवड समितीच्या एका सदस्याने सांगितले की, 'रोहित शर्माला कर्णधारपदावरुन दूर करण्याचा प्रश्नच येत नाही.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 10:13 AM