Join us  

उर्वरित लढतींमध्ये चांगली कामगिरी करू, आॅस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथचा निर्धार

भारताविरुद्ध पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान योजनाबद्ध खेळ करता आला नसला तरी मालिकेतील उर्वरित सामन्यांत नक्कीच चांगली कामगिरी करू, असा विश्वास आॅस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने व्यक्त केला. स्मिथ म्हणाला, ‘जर आम्ही विजय मिळवला असता तर आनंद झाला असता; पण ही पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत होती. मालिकेत अद्याप चार सामने शिल्लक आहे. मालिका जिंकण्यासाठी तीन सामन्यांत विजय मिळवावा लागेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 3:39 AM

Open in App

चेन्नई : भारताविरुद्ध पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान योजनाबद्ध खेळ करता आला नसला तरी मालिकेतील उर्वरित सामन्यांत नक्कीच चांगली कामगिरी करू, असा विश्वास आॅस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने व्यक्त केला.स्मिथ म्हणाला, ‘जर आम्ही विजय मिळवला असता तर आनंद झाला असता; पण ही पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत होती. मालिकेत अद्याप चार सामने शिल्लक आहे. मालिका जिंकण्यासाठी तीन सामन्यांत विजय मिळवावा लागेल.आगामी लढतींमध्ये आम्हाला दमदार पुनरागमन करावे लागेल. कोलकातामध्ये आम्ही परिस्थिती बदलण्यात यशस्वी ठरू.’स्मिथ पुढे म्हणाला, ‘पावसाच्या व्यत्ययानंतर नव्या चेंडूने १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नसते. आम्हाला वेगळ्या पद्धतीने खेळता आले असते. सुरुवातीला काही वेळ खेळपट्टीवर घालविता आला असता. आम्हाला चांगली योजना आखावी लागेल.’स्मिथने सांगितले की, ‘पांड्या व धोनी यांनी शतकी भागीदारी करताना संघाला ८७ धावसंख्येवरून द्विशतकाची वेस ओलांडून दिली. शेवटी ही भागीदारी निर्णायक ठरली. आम्ही नव्या चेंडूने चांगली सुरुवात केली; पण धोनी व हार्दिक चांगले खेळले. पूर्ण ५० षटके खेळणे नेहमीच चांगले असते.आम्ही येथे वन-डे सामने खेळण्यासाठी आलो आहोत. पण, आम्ही मैदानाबाहेर पडलो त्या वेळी जोरदार पाऊस आला. एका नव्या चेंडूने १६० धावा फटकावणे सोपे होते. पण दोन्ही टोकाकडून नव्या चेंडूला खेळणे कठीण असते. त्यांना सुरुवातीला अडचण भासली. आमच्याबाबतही हेच घडले. तुमच्याकडे पुनरागमन करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला बचावात्मक आणित्यानंतर आक्रमक खेळ करता आला असता.’ (वृत्तसंस्था)