India vs England, 3rd Test : अक्षर पटेल ( Axar Patel) व रविचंद्रन अश्विन ( R Ashwin) यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत दिवस-रात्र कसोटीत भारताला दुसऱ्या दिवशी इंग्लंडिवरुद्ध १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला. सामन्यात एकूण ११ बळी घेणारा अक्षर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आपला दुसरा कसोटी सामना खेळत असलेल्या अक्षरने गृहमैदानावर दुसऱ्या डावात ३२ धावांत ५ बळी घेतले. त्याने सामन्यांत एकूण ७० धावांत ११ फलंदाजांना बाद केले. अश्विनने ४८ धावांत ४ बळी घेतले आणि ४०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या विशेष क्लबमध्ये स्थान मिळवले. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात ८१ धावांत गारद झाला. भारताविरुद्ध त्यांची ही दुसरी नीचांकी धावसंख्या ठरली. तिसरी कसोटी दोन दिवसात संपल्यानंतर टीम इंडियाचा उर्वरित तीन दिवसांचा प्लान काय असेल, याबाबतची एक मजेशीर इस्टास्टोरी पोस्ट केली. त्यानं काल सायंकाळी ७.५१ ला ही स्टोरी पोस्ट केली. पण, आता त्यानं ती बदलली आहे.
जाफरच्या इस्टा स्टोरीत तिसऱ्या कसोटीच्या उर्वरित तीन दिवसांचा टीम इंडियाचा कार्यक्रम जाहीर केला गेला आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे आज टीम इंडिया अदानी पोर्टवर, तर उद्या रिलायन्स रिफायनरीला भेट देणार आहे. पाचव्या दिवशी गिर अभयारण्यात जाणार असल्याचे दिसत आहे. जाफरची ही गमतीदार इस्टा स्टोरी व्हायरल होत आहे. पण, त्यावरून ट्रोल होताना दिसताच त्यानं ती बदलली आहे आणि आता त्यानं इंस्टा स्टोरी ब्लॉक केली आहे.
कोहलीने मोडला धोनीचा विक्रम
इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून विजय मिळवित विराट कोहली भारतात सर्वाधिक विजय नोंदविणारा कर्णधार ठरला. त्याने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला. कोहलीने २९ कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व करताना २२ विजय मिळविले आहेत. धोनीने ३० कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व करताना २१ विजय मिळविले आहेत.
अश्विन ४००
ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी कारकिर्दीत ४०० बळी पूर्ण केले. असा पराक्रम करणारा अश्विन अनिल कुंबळे, कपिलदेव व हरभजन सिंग यांच्यानंतरचा चौथा भारतीय गोलंदाज, तर क्रिकेटविश्वातील सहावा फिरकीपटू ठरला. सर्वात
कमी कसोटींमध्ये अशी कामगिरी केलेला अश्विन दुसरा गोलंदाज ठरला. अश्विनने ७७ कसोटींत ही कामगिरी केली असून श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने ७२ कसोटींत हा पराक्रम केला आहे.
रुटने चेंडूने पाडली छाप
इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने गोलंदाजीत छाप पाडताना केवळ ८ धावांत ५ बळी घेत भारताला स्वस्तात गुंडाळले. सर्वात कमी धावांत ५ बळी घेण्याची सर्वोत्तम कामगिरी रुटने केली. याआधी ऑस्ट्रेलियाच्या टिम मे याने विंडीजविरुद्ध ९ धावांत ५, तर ऑस्ट्रेलियाच्याच मायकल क्लार्कने भारताविरुद्ध ९ धावांत ६ बळी घेतले होते. रुटची कामगिरी कसोटी कर्णधाराची दुसरी सर्वोत्तम ठरली.
Web Title: Leaked, Third test scheduled and itinerary drawn up by BCCI; Wasim Jaffer insta story goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.