कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर गंभीर आरोप करत त्याची पत्नी हसीन जहाँ ही प्रकाशझोतात आली आहे. पण हसीनचे आयुष्य कसे आहे, याबाबत या 10 गोष्टी जाणून घ्या...
1. कोलकात्यातील बंगाली मुसलमान कुटुंबात हसीनचा जन्म झाला.
2. हसीनचे वडिल ट्रान्सपोर्टचं काम करतात. हसीन जहाँला दोन बहिणी आहेत. मोठी बहीण दिल्लीत राहते, तर छोटी बहीण कोलकात्यात आहे.
3. शालेय जीवनापासून हसीनला मॉडेलिंगचे वेड होते. त्याचबरोबर बॉलीवूडमध्ये मी अभिनेत्री म्हणून नाव कमावणार, ही स्वप्नंही ती पाहत होती.
4. हसीन दहावीमध्ये असताना तिला एस. के. सैफुद्दिनने प्रपोज केले आणि त्यानंतर काही वर्षांतच त्यांचे लग्न झाले.
5. सैफुद्दिनचे कोलकात्यामध्ये किराणा मालाचे दुकान होते. या दोघांना दोन मुलीही झाल्या. पण हसीनला सैफुद्दिनबरोबर राहत असताना मॉडेलिंगमध्ये करीअर करता येत नव्हते. त्यामुळे तिने सैफुद्दिनशी काडीमोड घेतली आणि मुलींनाही आपल्याबरोबर ठेवले नाही.
6. हसीनने सैफुद्दिनला सोडल्यावर मॉडेलिंग करायला सुरुवात केली. 2012 साली हसीन कोलकाता नाइट रायडर्स संघाची ' चीअरलीडर ' होती.
7. चीअरलीडर असताना ती शामीच्या प्रेमात पडली. त्यानंतर दोन वर्षे हे दोघे डेटिंग करत होते.
8. दोन वर्षांच्या डेटिंगमध्ये तिने शामीला पुरते जाणून घेतले. तो काय करतो आणि आपण पुढे काय करायला हवे, हे तिने मनाशी पक्के केले आणि शामीला लग्न करण्यासाठी राजी केले.
9. शामी आणि हसीन यांनी 6 जून 2014 ला लग्न केले. पण लग्नानंतरही ती आपल्या दोन्ही मुलींशी कायम संपर्कात होती.
10. शामीच्या कुटुंबियांना हसीनने मॉडेलिंग करणे पसंत नव्हते. त्यामुळे हसीनने आपल्या डोक्यातून मॉडेलिंग करण्याचा विचार काढून टाकला.