नवी दिल्ली, दि. 18 - क्रिकेटमध्ये एका धावेची किंमत तोच सांगू शकतो ज्या संघानं एका धावेनं सामना गमावला आहे. एक धाव वाचवण्यासाठी खेळाडू आपल्या जिवाचं रान करतात. अशातच चौकार वाचवण्याच्या प्रयत्नात खेळाडूंना अनेकवेळा लाजिरवाण्या गोष्टीला सामोर जावं लागते. क्रिकेटच्या खचाखच भरलेल्या मैदानात एखाद्या खेळाडूची पँट कंबरेच्या खाली घसरल्यास तो खेळाडू हस्याचं कारण होतो. त्यावेळी त्या खेळाडूची मान शरमेनं खाली जात असेल. यू ट्यूबवर अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ आहेत. ज्यामध्ये धावा वाचवण्याच्या प्रयत्नात सीमारेषावर खेळाडूंची पँट कंबरेच्या खाली आलेली दिसतेय. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंची नावे आहेत ती वाचून तुम्हाला धक्काच बसेल. तर चला मग जाणून घेऊयात खचाखच भरलेल्य मैदानात क्षेत्ररक्षणा वेळी खेळाडूंची झालेली फजीती.
पाकिस्तान-दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना यासिर शाहची पँट अचानक उतरली होती. शाहिद आफ्रिदीच्या चेंडूवर कायले अबॉटने जोगदार फटका लावला. सीमारेषावर चेंडू आडवण्याच्या प्रयत्नात यासिर शाहची पँट उतरली.
इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन मिड ऑफवर क्षेत्ररक्षण करत असाताना त्यांची पँट उतरली होती. सिवनाराण चंद्रपॉलने लगावालेला फटका आडवण्याच्या प्रयत्नात वॉनची पँट उतरली होती.
न्यूझीलंडच्या लूय विनसेंट या माजी खेळाडूलाही अशा लाजीरवाण्या घटनेला सामोर जाव लागले आहे. वेस्टइंडीज विरोधात 2006 मध्ये क्षेत्ररक्षण करताना विनसेंटची पँट खाली उतरली. विनसेंट संघासाठी धावा वाचवू शकला पण स्वत:ची पँट वाचवण्यात त्याला अपयश आले.
द. आफ्रिकेच्या नील मिकँजीलाही या घटनेला सामोर जाव लागल आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील एका सामन्यात मायकल बेवनने मारलेला फटका अडवण्याच्या प्रयत्नात त्याची पँट खाली आली होती.नीलची मैदानात उतरलेली पँट पाहून सहकारी खेळाडू शॉन पोलक आपलं हसू रोखू शकला नाही.
स्टुअर्ट ब्रॉडचीही पँट उतरली आहे. पण ती सामाना खेळताना नाही तर सराव करतेवेळेस त्याला या घटनेला सामोर जावं लागलं आहे. सराव करताना जो रुटने अचानक स्टुअर्ट ब्रॉडची पँट खाली खेचली आणि पळाला.
यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीचेही नाव आहे. विराट कोहली एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे हे तुम्हाला माहितच आहे. पण लंकेविरोधातील एका सामन्यात चोकार वाचलण्याच्या प्रयत्नात विराटची पँट खाली आली होती. लंकेविरोधात भारताने सामना गमावल्यात जमा होता. त्यावेळी ड्राइव्ह मारत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्यात अपयश आले. त्यावेळी त्याची पँट उतरली. विराटती झालेली गोची पाहून युवराज सिंगला हसू अनावर झाले होतं.