LLC Auction 2024- लीजेंड्स लीग 2024 च्या लिलावात श्रीलंकेचा माजी क्रिकेटर इसुरु उडाना हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. हैदराबादच्या संघाने २०.९७५ मूळ किंमत असलेल्या खेळाडूवर तिप्पट पैसा मोजला. जवळपास ६२ लाख रुपये खर्च करुन हैदराबादच्या संघाने उडानाला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. त्याच्याशिवाय हैदराबाद फ्रँचायझी संघाने चॅडविक वाल्टन याला ६० लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात जोडले.
धवनसह दिनेश कार्तिकही उतरणार मैदानात
लीजेंड्स लीग क्रिकेटच्या तिसऱ्या हंगामात शिखर धवन आणि दिनेश कार्तिक या मंडळींचा जलवा देखील पाहायला मिळणार आहे. या लीगमधून तगडी कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ते निश्चितच आघाडीवर असतील. पण त्यांना किती पैसे मिळाले, ते अद्याप गुलदस्त्याच आहे. लीजेंड्स लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी झालेल्या लिलावात ज्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागली त्यात आघाडीच्या तिघांमध्ये परदेशी खेळाडूंनी भाव खाल्ल्याचे दिसून येते.
लीजेंड्स लीगमधील सर्वात महागडे ठरलेले तीन खेळाडू
इसारू उडाना ६१ लाख ९७ हजार - अर्बनायझर्स हैदराबादचॅडविक वॉल्टन ६० लाख ३६ हजार -अर्बनायझर्स हैदराबादडॅनियल क्रिस्चियन ५१ लाख मनिपाल टायगर्स
भारताकडून हा खेळाडू ठरला सर्वात महागडा
इंडिया कॅपिटल्स संघाने धवल कुलकर्णीला ५० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. लिलालात भारताकडून सर्वाधिक रक्कम मिळालेल्या खेळाडूंमध्ये तो आघाडीवर आहे. याशिवाय फिरकीपटू प्रविण तांबे याच्यावर लिलावात ३८ लाख रुपये बोली लागली.