Legends League Cricket 2024 : वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात असणार आहे. तो लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये गुजरात ग्रेट्सच्या संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. आज बुधवारी गेलचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. जोधपूर येथे गेलला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. ड्वेन ब्राव्होच्या प्रसिद्ध अशा चॅम्पियन गाण्याचा आवाज गेलच्या एन्ट्रीवेळी ऐकायला मिळतो. पुष्पगुच्छ देऊन गेलचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धेत यंदा अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला शिखर धवन खेळत आहे. गेल धवनच्याच नेतृत्वात खेळताना दिसेल. याशिवाय दिनेश कार्तिक देखील लीजेंड्स लीग क्रिकेटचा भाग आहे.
जोधपूर येथून या स्पर्धेला सुरुवात झाली, इथे सुरुवातीचे सहा सामने खेळवले जात आहेत. तसेच २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सूरत येथे सामने होतील, तर ३ ऑक्टोबरपासून ७ ऑक्टोबरपर्यंत जम्मूत सामन्यांचा थरार रंगेल. अखेरचे काही सामने ९ ऑक्टोबरपासून श्रीनगर येथे होतील. तर, चेन्नई येथे १६ ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. सहा संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात आहेत. लीजेंड्स लीग क्रिकेटचे लाईव्ह सामने स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. याशिवाय फॅनकोड ॲपवर चाहत्यांना ही स्पर्धा पाहता येईल. लीजेंड्स लीग क्रिकेट २०२४ चा पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू झाला, तर काही सामने ३ वाजता देखील खेळवले जातील.
गुजरात ग्रेट्सचा संघ शिखर धवन (कर्णधार), ख्रिस गेल, लियाम प्लंकेट, मॉर्ने वान विक, लिंडल सिमंस, असोहर अफोहान, जेरोम टेलर, पारस खाडा, सीकुगे प्रसन्ना, कमाउ लेवररॉक, सायब्रांड एनोएलब्रेक्ट, शॅनन गेब्रियल, समर क्वाड्री, मोहम्मद कैफ, एस श्रीसंत.