LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक

Martin Guptill, Legends League Cricket: मार्टिन गप्टिलने ५४ चेंडूत केली १३१ धावांची नाबाद खेळी, पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 03:34 PM2024-10-03T15:34:44+5:302024-10-03T15:35:31+5:30

whatsapp join usJoin us
Legends League Cricket 2024 Martin Guptill scored daddy hundred with huge 11 sixes 9 Fours KSO vs SSS | LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक

LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Martin Guptill Century, Legends League Cricket Video: लिंजड्स लीग क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा माजी सलामीवीर मार्टिन गप्टिलचा झंझावात पाहायला मिळाला. सदर्न सुपर स्टार विरूद्ध कोणार्क सूर्याज् या संघामध्ये झालेल्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. प्रथम फलंदाजी करताना कोणार्क संघाने २० षटकात १९२ धावा कुटल्या. तर प्रत्युत्तरात सुपर स्टार्स संघाने अवघ्या १६ षटकात १९५ धावा करत सामना जिंकला. या सामन्याचा हिरो ठरला मार्टिन गप्टिल. त्याने झंजावाती शतक ठोकत सामनवीराचा किताब पटकावला.

१९३ धावांच्या मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सदर्न सुपर स्टार्स संघ मैदानात आला आणि त्यांनी धुवाँधार फटकेबाजीला सुरुवात केली. सलामीवीर श्रीवत्स गोस्वामी १८ धावांवर माघारी परतला. पण मार्टिन गप्टिलने धुलाई सुरुच ठेवली. गप्टिल फटकेबाजी करत असताना हॅमिल्टन मसाकात्झा दुसऱ्या बाजूने शांतपणे त्याची फलंदाजी पाहत होता. ९० धावांची भागीदारी झाल्यानंतर हॅमिल्टन २० धावांवर बाद झाला. पण गप्टिलने नाबाद राहत फलंदाजी कायम ठेवली. त्याने ४८ चेंडूत शतक ठोकले. त्यानंतरही सामना जिंकेपर्यंत त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. गप्टिलने ९ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने ५४ चेंडूत १३१ धावांची नाबाद खेळी केली.

गप्टिलने मारलेले ११ उत्तुंग षटकार:-

मार्टिन गप्टिलच्या संपूर्ण खेळीचे हायलाइट्स:-

Web Title: Legends League Cricket 2024 Martin Guptill scored daddy hundred with huge 11 sixes 9 Fours KSO vs SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.